There is a discussion on social media that the person who trolls Hardik Pandya will be sent off the ground.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Indians IPL 2024: आयपीएल 2024 चं हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सच्या संघातून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आपल्या संघात परत घेतलं. हार्दिक पांड्याला संघात घेताना त्याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. मुंबईचं कर्णधारपद 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले. 

मुंबईचा पहिला सामना नरेंद्र मोदी मैदानावर गुजरातविरुद्ध झाला. यावेळी रोहित शर्माच्या चाहत्यांनी मैदान गाजवत हार्दिक पांड्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा सामना हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला. एस.मानसिंग मैदानावर देखील उपस्थित चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणा दिल्या. याचदरम्यान मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे. 

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना या चार सामन्यांसाठी चाहत्यांचं पाठबळ मिळणार आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांचा विचार करता वानखेडे मैदानावर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर या सामन्यासाठी पोलीस आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था मैदानावर ठेवण्यात येणार आहे. हार्दिक पांड्याला ज्या व्यक्तीकडून ट्रोल केले जाईल, त्या व्यक्तीला थेट मैदानाबाहेर काढणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र मैदानावर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक असल्याचे सुरक्ष रक्षकांना हे कितपत जमेल, हे त्यावेळीच समोर येईल.

मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट-

मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

मुंबईचे पुढील 4 सामने –

मुंबई विरूद्ध राजस्थान (1 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध दिल्ली (7 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध आरसीबी (11 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध चेन्नई (14 एप्रिल 2024) 

मुंबई कमबॅक करणार?

मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यांमधील पराभव एकतर्फी झालेला नव्हता. मुंबईचा पराभव अटतटीच्या लढतीत झाला. गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव 6 धावांनी झाला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावा केलेल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 6 विकेटवर 246 धावा करु शकला. म्हणजेच मुंबईनं दोन्ही मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करेल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts