Pankaja Munde : ‘बजरंग सोनवणे सध्या विरोधक, मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं’, पंकजा मुंडेंचा सूचक इशारा( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अद्याप पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर झालेला नाही. बीडची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.  पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडे विरोधात राष्ट्रवादीकडून उभा राहणारा उमेदवार हा पुन्हा भाजपमध्ये येतो यापूर्वी रमेश आडसकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते नंतर आता भाजपमध्ये आले सुरेश धस यांनी सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि ते सुद्धा भाजपमध्ये आले. 

18 तारीख आणखी लांब

2019 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेले बजरंग सोनवणे हे सध्या तरी विरोधक आहेत. मात्र आणखी काही सांगता येत नाही 18 तारीख आणखी लांब आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी दरवेळी भाजपच्या विरोधात निवडणूक लढणारा पुन्हा भाजपमध्ये येतो या प्रश्नाला उत्तर देताना काहीही होऊ शकतं, असा सूचक इशारा दिला आहे. 

विरोधकांवर ऐनवेळी उमेदवार आणण्याची वेळ येते 

लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवाराची घोषणा होऊन आज पंधरा दिवस झाले. मात्र आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरत नाही. मात्र हे दरवेळी होतं ऐनवेळी कुणाला तरी उमेदवार म्हणून आणण्याची वेळ विरोधकांवर येते, असं मत सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 

पंकजा मुंडेंनी घेतली प्रकाश सोळंकेंची भेट

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली. बीड जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलो असलो तरी आम्ही वैयक्तिक द्वेष ठेवला नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Solanke on Pankaja Munde : मुंडेसाहेबांचे ऋण फेडायची वेळ आलीय, प्रकाश सोळंकेंची भावना, पंकजा मुंडेंना शब्द!

Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?

अधिक पाहा..

Related posts