shivsena leader vijay shivtare given reason why he decided not to contest from baramati after call from khatgaonkar( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivesna) नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते मी बारामतीची निवडणूक (Baramati Election) लढवणार आहे, असे ते सांगत होते. काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती . मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली. मी निवडणुकीला उभा राहिलो तर 10 ते 20 जागांवर आपले उमेदवार पडू शकतात, असे मला सांगण्यात आले. म्हणूनच मी माघार घेतली, असे स्पष्टीकरण यावेळी शिवतारे यांनी दिले.

माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली. तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता. पण मला एक फोन आला. हा फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा होता. मी ऐकत नव्हतो म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री रागावलेही होते. मात्र खतगावकरांचा मला एक फोन आला. मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला तुमच्यामुळे अडचण होत आहे, असं त्यांनी मला सांगितलं. सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर कदाचित 10 ते 20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. 

अधिक पाहा..

Related posts