Nashik Lok Sabha Constituency Mahauti Dispute Sanjay Shirsat Reply to Chhagan Bhujbal Shiv Sena NCP marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : नशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीमधील (Mahayuti)  संघर्ष कमी तर होत नाही, पण रोज कोणत्या कोणत्या कारणाने वाढतच चालला आहे. आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या एका दाव्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. ‘उमेदवारीसाठी मी मागणी केली नव्हती, पण दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याला तात्काळ शिंदे गटाकडून (Shinde Group) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची नाशिकची (Nashik) जागा आम्ही सोडणार नाही’ असे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत. 

भुजबळ यांच्या दाव्यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “आता कुणाची उमेदवारी दिल्लीहून आली असे म्हणतात, याबद्दल आम्हाला कल्पना नाही. पण अशाप्रकारे कुणाला दिल्लीहून उमेदवारी मिळाली म्हणून उभे राहायचं सांगितलं असेल, तर ते समोर येईलच. पण, ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे. जिथून एक माणूस दोन वेळा मोठ्या मताने जिंकून येतो, ती जागा काढून घेणे म्हणजे शिवसैनिकांचा अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे आणि असा प्रकार आम्ही होऊ देणार नाही, असं शिरसाट म्हणाले. 

मुख्यमंत्री नाशिकच्या जागेसाठी सकारात्मक…

पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, “नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने प्रचार सुरू केला आहे. एक निश्चित आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे असा आग्रह नाशिकच्या नागरिकांचा आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला द्यावी किंवा शिवसेनेने सोडू नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आहे. आम्ही देखील मुख्यमंत्री यांना याबाबत सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी देखील यावर आपण सकारात्मक विचार करू असं सांगितले असल्याचे शिरसाट म्हणाले 

राजकीय रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री चार ते पाच तास नॉट रिचेबल…

दरम्यान शुक्रवारी अचानक मुख्यमंत्री पाच तसा गायब झाले होते. यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या लोकांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी होत आहे. अशावेळी राजकीय निर्णय घेण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ मुख्यमंत्र्यांना मिळत नव्हता. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री चार ते पाच तास नॉट रिचेबल होते, असेही शिरसाट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून नाशिकच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत; फडणवीसांचे नाव घेत सांगितली ‘अंदर की बात’!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts