Hemant Godse : काळारामाच्या दर्शनाने प्रचाराचा श्रीगणेशा, नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Loksabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. अद्याप महायुतीतून (Mahayuti Seat Sharing) नाशिकमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हेमंत गोडसेंची भेट झाली नसली तर त्यांना नाशिकची जागा शिवसेनेलाच (Shiv Sena) मिळेल असे आश्वासन देण्यात आले आहे. 

त्यामुळे हेमंत गोडसे यांनी आज नाशिकचे काळाराम मंदिर (Kalaram Mandir) आणि शालिमार येथील हनुमान मंदिरात (hanuman Mandir) दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. यातून गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजपला (BJP) एकप्रकारे इशाराच दिला आहे. 

आम्हाला देखील निश्चितच उमेदवारी मिळेल

नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सबर का फल मीठा होता है, तुम्ही केलेली कामे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचावा. प्रत्येक विद्यमान खासदार हा बाळासाहेबांना प्रेरित होऊन शिंदे गटात गेला. पहिल्या यादीत सगळ्या विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली. आम्हाला देखील निश्चितच उमेदवारी मिळेल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. 

आजपासून मी प्रचाराचा शुभारंभ करतोय – हेमंत गोडसे 

ही जागा मुळातच शिवसेनेची आहे. आम्ही केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहे. उमेदवार हे हेमंत आप्पाच असतील असे शिवसैनिकांनी यावेळी सांगितले. गोडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रचाराचे पत्रक देखील जनतेला वाटण्यात आले. आजपासून मी प्रचाराचा शुभारंभ करीत आहे, असे हेमंत गोडसे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

भुजबळांचा गोडसेंना टोला 

हेमंत गोडसे तिकिटासाठी आग्रही आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आमच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. गोडसेंनी प्रचार सुरू केला असला तर चांगलेच आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असो उमेदवाराला फायदाच होईल, असा टोला छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंना लगावला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून नाशिकच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत; फडणवीसांचे नाव घेत सांगितली ‘अंदर की बात’!

नाशिकची जागा सोडणार नाही! शिंदे गट पुन्हा आक्रमक; भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद वाढला…

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts