sharad pawar s ncp first candidate list announced for loksabha eletion 2024 former congress mla amar kale confirm from wardha maharashtra marathi new( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar’s NCP : शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी (NCP Lok Sabha Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी (Wardha Lok Sabha 2024) काँग्रेससोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या अमर काळेंच्या (Amar Kale) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. 

काँग्रेससोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. या 5 जणांच्या यादीत शरद पवारांनी (Sharad Pawar) यापूर्वी दिलेल्या सरप्राईज नावांवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंना (Amar Kale) उमेदवारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे.  भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. निलेश लंके यांनी निकतेच आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नितेश कराळे मास्तरांऐवजी अमर काळेंना संधी 

महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र आज अखेर नितेश कराळे ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र यंदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

कोणाला कोठून उमेदवारी?

वर्धा     – अमर काळे
दिंडोरी   – भास्करराव भगरे
बारामती -सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

Related posts