watch video rahul chahar cleaned up marcus stoinis after back to back sixes LSG vs PBKS IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LSG vs PBKS, IPL 2024 :  लखनौ सुपर जायंट्सने पंजाबविरोधात प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभारला. पंजाबकडून क्विंटन डी कॉकने अर्धशतक ठोकले, तर निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांनी फटकेबाजी केली. विस्फोटक मार्कस स्टॉयनिस यानं 12 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिले. लखनौच्या फलंदाजीवेळी स्टॉयनिस आणि राहुल चाहर यांच्यातील सामना पाहण्यासारखा झाला. स्टॉयनिस फलंदाजीला आला पण त्याला सूर सापडत नव्हता. पहिल्या 9 चेंडूवर त्याला फक्त 7 धावाच करता आल्या. त्याला एकही चौकार आणि षटकार मारता आला नाही. पण राहुल चाहरविरोधात स्टॉयनिसने आक्रमक पवित्रा धारण केला. लेग स्पिनर राहुल चाहर याची गोलंदाजी फोडण्याचा स्टॉयनिसने प्रयत्न केला, पण त्याला राहुल चाहरने जोरदार प्रत्युत्तर दिले.  

लागोपाठ दोन षटकार – 

पंजाबविरोधात धावांसाठी झगडणाऱ्या मार्कस स्टॉयनिसने राहुल चाहरविरोधात आक्रमक रुप घेतले. आठव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर स्टॉयनिसने उभ्या उभ्या स्ट्रेटला षटकार मारला. षटकार पडल्यानंतर राहुल चाहरने सावध होत आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, पण स्टॉयनिस या चेंडूलाही तयार होता. राहुल चाहरच्या शॉर्ट चेंडूला स्टॉयनिसने सिमारेषा पार पाठवलं. स्टॉयनिसने लागोपाठ दोन षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. 
 
राहुल चाहरचा पलटवार – 

मार्कस स्टॉयनिसने लागोपाठ दोन षटकार मारत वेगवान धावा काढण्याचा मानस दाखवला. पण राहुल चाहर शांत बसणाऱ्यातील नव्हता. त्याने पुढच्याच चेंडूवर स्टॉयनिसची दांडी उडवली. राहुल चाहरने याने सलग दोन षटकार खाल्ल्यानंतर वेगाने चेंडू टाकला.. स्टॉयनिसने हा चेंडूवर सिमारेषाबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू दांड्यावर जाऊन आदळला.. स्टॉयनिसचा त्रिफाळा उडाला. स्टॉयनिसचा त्रिफाळा उडवल्यानंतर राहुल चाहरचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. पहिल्या दोन्ही सामन्यात राहुल चाहर महागडा ठरला होता, पण लखनौविरोधात त्यानं कमबॅक केले. 

स्टॉयनिसची छोटेखानी खेळी – 

मार्कस स्टॉयनिस यंदाच्या हंगामात लयीत दिसत नाही. त्याच्या बॅटमधून धावा निघताना दिसत नाही. एकेरी दुहेरी धावांसाठीही त्याला झगडावं लागत आहे. स्टॉयनिसला आजच्या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. स्टॉयनिसने 12 चेंडूमध्ये दोन षटकारांच्या मदतीने फक्त 19 धावा केल्या. याआधीच्याही सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. 

राहुल चाहरची गोलंदाजी कशी – 

लखनौविरोधात राहुल चाहर याची गोलंदाजी महागडी ठरली. राहुल चाहरने 3 षटकांमध्ये 32 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने तब्बल 4 षटकार आणि एक चौकार दिला. राहुल चाहर याला फक्त एकच विकेट मिळाली.

अधिक पाहा..[ad_2]

Related posts