DC vs CSK Dream11 Prediction IPL Fantasy Cricket Tips Playing XI Pitch Report & Injury Updates For Match 13 of IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DC vs CSK Dream11 Prediction : ऋषभ पंतचा दिल्ली आणि ऋतुराज गायकवाड याचा चेन्नई संघ आज आमनेसामने असतील. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता विशाखापट्टनम येथे सामन्याला सुरुवात होणार आहे. आजचा हा सामना अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

दिल्लीच्या संघाला अद्याप सूर गवसलेला नाही, पण ताफ्यात एकापेक्षा एक धुरंधर खेळाडूंचा भरणा आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ फॉर्मात आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल, तर दिल्ली अद्याप पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरेल. चेन्नई आणि दिल्लीच्या ताफ्यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. दिल्ली आणि चेन्नई संघाकडून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.  त्याआधी कोणत्या खेळाडूची कामगिरी कशी आहे, ते जाणून घेऊयात…

सर्वाधिक विकेट – 

 मुस्तफिजुर रहमान  यानं सर्वाधिक 6 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादव, दीपक चाहर आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या आहेत. तुषार देशपांडेने दोन फलंदाजांना बाद केले आहे, तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली आहे.

सर्वाधिक धावा – 

 चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील खेळाडूपैकी शिवम दुबे यानं यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. दुबे याने दोन सामन्यात 85 धावा काढल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रचिन रवींद्र याने 83 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर आहे, त्याने दोन सामन्यात 78 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने 61, ट्रिस्टन स्टब्स 49 आणि डॅरेल मिचेल याने 46 धावा केल्या आहेत.  

बेस्ट स्ट्राईक रेट – 

रचिन रविंद्र याने तब्बल 237.14 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. तर समीर रिझवी याने 234 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या आहेत. अभिषेक पोरेल याने 205 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मिचेल मार्श याने 179 तर शिवम दुबे याने 167 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या आहेत. 

फॅन्टेसी प्लेईंग 11 – 

विकेटकीपर – ऋषभ पंत

फलंदाज – रचिन रवींद्र, शिवब दुबे, डेविड वॉर्नर, ऋतुराज गायकवाड, ट्रिस्टन स्टब्स

अष्टपैलू – डॅरेल मिचेल, मिचेल मार्श, अक्षर पटेल

गोलंदाज – मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

कर्णधार – ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रचीन रविंद्र …( यापैकी कोणताही एक खेळाडू कर्णधार म्हणून निवडू शकता)

उपकर्णधार – ट्रिस्टन स्टब्स,मुस्तफिजुर रहमान, डेविड वॉर्नर ( यापैकी कोणताही एक खेळाडू उपकर्णधार म्हणून निवडू शकता)

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts