Police dance On DJ In Front Harsul Central Jail In Chhatrapati Sambhaji Nagar dance video viral marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Police Dance Video Viral : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) हर्सूल मध्यवर्ती कारागृहाबाहेर (Harsul Central Jail) पोलिसांनी डिजेच्या (DJ) तालावर थिरकत असल्याचा व्हिडीओ (Video) समोर आलाय. अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नियम धाब्यावर बसवत डान्स केलाय. कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेत नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्याच बेधुंद नाचगण्याचा कार्यक्रम पाहून गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. 

छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेत नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्याच बेधुंद नाचगण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हर्सूल कारागृहातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी शनिवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर डीजे लावून काही कर्मचारी अधिकारी नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये अनेक पोलीस गणवेशात डान्स करतांना दिसत आहे. गाण्याच्या कर्कश आवाजावर बेधुंदपणे नाचत असलेल्या या पोलिसांना आचारसंहितेचे देखील भान नसल्याचे पाहायला मिळाले. 

सामन्यांवर कारवाई, मग पोलिसांना वेगळे नियम आहेत का? 

धक्कादायक म्हणजे डीजेवर नाचत असतांना काही पोलीस हवेत स्नो स्प्रे करताना देखील व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या कार्यक्रमात काही स्थानिक देखील सहभागी झाल्याचे देखील भान पोलिसांना उरले नव्हते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले असून, सर्वसामान्य लोकांवर थेट कारवाई केली जात आहे. एवढंच काय तर सार्वजनिक ठिकाणी उत्सवासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. मात्र, हर्सूल कारागृहा बाहेरच सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे पोलिसांना वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे डीजेसाठी स्थानिक पोलिसांची कोणतेही परवानगी घेण्यात आली नव्हती.

कारवाई होणार का? 

न्यायालयाने डीजेवर बंदी घातली असतांनाही अनेक कार्यक्रमात डीजेचा वापर केले जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अशावेळी पोलिसांवर कारवाईची जबाबदारी असते. मात्र, संभाजीनगरमध्ये तर चक्क पोलिसांनीच डीजे लावून थेट आचारसंहिता काळात ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी तर अंगावर गणवेश असतांना देखील डान्स केला. विशेष म्हणजे हर्सूल कारागृहात अनेक मोठ्या गुन्ह्यातील आरोप कैद आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने नेहमी काळजी घेतली जाते. मात्र, असे असतांना देखील थेट हर्सूल कारागृहाच्या प्रवेशावर शनिवारी रात्री झालेला गोंधळ पाहता याची गंभीर दखल घेऊन कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maratha Community Meeting : मराठा समाजाच्या बैठकीत राडा, थेट एकमेकांना मारहाण; अखेर पोलिसांत गुन्हा दाखल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts