Ram Satpute calls devendra Fadnavis from meeting promises to withdraw cases against as many as 250 people

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) सध्या सोलापूर (Solapur) शहरात प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत. काल (30 मार्च) संध्याकाळी राम सातपुते यांनी मोची समाज बांधवाची भेट घेतली. यावेळी शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या व्यथा राम सातपूते यांना सांगितल्या. कोरोना काळात मोची समाजातील युवा नेता करण म्हेत्रे यांचा मृत्यू झाला होता. 

करण म्हेत्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच या गर्दीत पोलिसांशी हुज्जत देखील घातल्याचे प्रकार घडले होते. ज्यानंतर पोलिसांनी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 250 लोकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 नुसार गुन्हा दखल केला होता. हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी ज्योती वाघमारे यांनी केली. 

बैठकीतून राम सातपुतेंचा फडणवीसांना फोन

यावेळी भाजप आमदार तथा सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी बैठकीतूनच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. घडलेला संपूर्ण प्रकार सांगून मोजी समाज बांधवांवरील हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे गुन्हॆ मागे घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीत उपस्थित मोची बांधवानी टाळ्या वाजवत धन्यवाद व्यक्त केले. 

सोलापुरातील 12 अतिरेक्यांना सोडण्याचे काम 

दरम्यान, राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे आणि त्यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी जिल्ह्यात आयटी पार्क केला नसल्याने बोलण्यासारखं काही नाही, पण मुख्यमंत्री असताना सोलापुरातील 12 अतिरेक्यांना सोडण्याचे काम केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला होता. राम सातपुते यांनी समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालय मंगळवेढाम्ये सदिच्छा भेट दिल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सेवेची संधी द्या मग खासदार म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो

ते यावेळी बोलताना म्हणाले की, विकासापेक्षा घराणेशाहीचा वारसा असणाऱ्या एका राजकन्येला लोकशाहीची आणि जनतेची ताकद दाखवून देण्यासाठी संघर्षाच्या खाईतून निर्माण झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. मला सेवेसाठी पाठवल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीच्या रूपाने आपल्या सेवेची संधी द्या मग खासदार म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो अशी ग्वाही सातपुते यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts