Solapur Lok Sabha Constituency Former MLA Dilip Mane join Congress Sushilkumar Shinde Praniti Shinde marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Solapur Lok Sabha Constituency : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजपचे उमेदवार (BJP Candidate) राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पहिला डाव टाकला असल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार दिलीप माने हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दुपारी एक वाजता मुंबईतल्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये परतत असल्याने काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेना याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. दिलीप माने हे जवळपास 25 वर्ष काँग्रेसमध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवलेली होती. मात्र, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणात कुठल्याही पक्षात सक्रिय नव्हते. परंतु, आत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये पुन्हा परतत आहेत.

कोण आहेत दिलीप माने? 

दिलीप माने हे दक्षिण सोलापूर विधानसभेचे माजी आमदार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन देखील माने राहिले आहेत. विविध बँक, पथसंस्था, शाळा, महाविद्यालयाचे सध्या ते चेअरमन आहेत.  उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.  2019 मध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक देखील त्यांनी लढवली होती.  या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते शिवसेनेत सक्रिय नव्हते. मात्र, वैयक्तिक पातळीवर सामाजिक आणि राजकीय काम सुरूच होते. तसेच, येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी दिलीप माने इच्छुक आहेत. 

मागील निवडणुकीवेळी भाजपने पुलवामा घडवले : प्रणिती शिंदे 

भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं? हा एकच प्रश्न विचारा त्याची बोलती बंद होईल. तो तुम्हाला एक तर शिंदे साहेबांनी काय केले असे विचारेल किंवा धर्म, जात, पातमध्ये तोडण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा भाजपला काही मुद्दे राहत नाहीत तेव्हा ते काहीतरी घडवतात. जातीमध्ये तेढ निर्माण करतात, त्यामुळे सावध राहा. मागील निवडणुकी वेळी पुलवामा घडवले. त्यांचे अधिकारीचं म्हणाले पुलवामा घडवले आहे, घडले नाही. कसं घडवलं? तर आपल्याच जवानांच्या रक्तावर घडवलं. ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आणा अन्यथा देशाची वाईट परिस्थिती होईल असे प्रणती शिंदे म्हणाल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ram Satpute : भर बैठकीतून राम सातपुतेंचा फडणवीसांना फोन, तब्बल 250 जणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts