Mayank Yadav Fastest Ball IPL News Marathi: LSG Mayank Yadav The 21 Year Old Debutant Has Record The Fastest Ball Of The Ipl 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mayank Yadav Fastest Ball IPL News Marathi: सलामीवीर क्विंटन डिकॉकचे अर्धशतक, निकोलस पूरन, कृणाल पांड्या यांची मोलाची खेळी आणि त्यानंतर मयांक यादव व मोहसीन खान यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर लखनौ संघाने आयपीएल 2024 मध्ये शनिवारी पंजाब संघावर 21 धावांनी शानदार विजय मिळवला. लखनौचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 8 बाद 199 धावा केल्या. पंजाबला 20 षटकांत 5 बाद 178 धावांवर रोखून लखनौ संघाने विजय मिळवला.

लखनौ संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक यादवने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केले. मयंक यादनवे आपल्या पदापर्णाच्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकत ( fastest ball of IPL 2024 ) साऱ्यांना अवाक् केले. त्याशिवाय पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. मयंकने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात जलद (155.8 प्रति ताशी वेग) चेंडू टाकला. मयंकने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 156, 150, 142, 144, 153 आणि 149 च्या प्रति ताशी वेगाने गोलंदाजी केली.

IPL 2024 मध्ये जलद गतीने चेंडू टाकणारे गोलंदाज

मयंक यादव – 155.8 प्रति ताशी वेग
नंद्रे बर्गर – 153 प्रति ताशी वेग
गेराल्ड कोएत्झे – 152.3 प्रति ताशी वेग 
अल्झारी जोसेफ – 151.2 प्रति ताशी वेग
मथीक्क्षा पथिराना – 150.9 प्रति ताशी वेग

IPL इतिहासात जलद गतीने चेंडू टाकणारे गोलंदाज

शॉन टेट – 157.71 प्रति ताशी वेग
लॉकी फर्ग्युसन – 157.3 प्रति ताशी वेग
उमरान मलिक – 157 प्रति ताशी वेग
एनरिक नॉर्खिया – 156.2 प्रति ताशी वेग
मयंक यादव – 155.8 प्रति ताशी वेग

मयंकची कामगिरी –

मयंकची एकूण कामगिरी चांगली झाली आहे. त्याने 11 टी-20 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. या काळात एका सामन्यात 20 धावांत 3 बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मयंकने 17 लिस्ट ए मॅचमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. त्याने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. यामध्ये 2 बळी घेतले. मयंकने लिस्ट ए मॅचमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध 3 विकेट घेतल्या होत्या. नोव्हेंबर 2023 मध्ये अहमदाबादमध्ये हा सामना झाला होता.

संबंधित बातम्या:

IPL 2024 Latest Points Table: चेन्नई अव्वल, दिल्ली-मुंबई तळाला; लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल, पाहा Latest Points Table

…तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

अधिक पाहा..[ad_2]

Related posts