Mumbai Indians Hardik Pandya-Rohit Sharma: MCA will follow the BCCI guidelines on crowd behaviour

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Indians Hardik Pandya-Rohit Sharma: मुंबईचं कर्णधारपद 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला मैदानातील प्रेक्षकांकडून ट्रोल केले जात आहे. 

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांचा विचार करता वानखेडे मैदानावर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर या सामन्यासाठी पोलीस आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था मैदानावर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तसेच हार्दिकला डिवचणाऱ्यांना मैदानाबाहेर काढणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र हे वृत्त मुंबई क्रिकेट असोशिएशन (MCA)ने खोडून काढले आहे. 

हार्दिक पांड्याला टार्गेट करणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी एमसीए अतिरिक्त पोलीस उभे करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे एमसीएने स्पष्ट केले आहे. हार्दिकला नापसंती दर्शवणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी एमसीएने अधिक सुरक्षारक्षक नेमल्याचे वृत्त खोटे आहे. ही फक्त अफवा आहे. अशा कोणत्याही सूचना एमसीएकडून देण्यात आलेल्या नाहीत. एमसीए बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याचे एमसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईचे पुढील 4 सामने –

मुंबई विरूद्ध राजस्थान (1 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध दिल्ली (7 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध आरसीबी (11 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध चेन्नई (14 एप्रिल 2024) 

मुंबई कमबॅक करणार?

मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यांमधील पराभव एकतर्फी झालेला नव्हता. मुंबईचा पराभव अटतटीच्या लढतीत झाला. गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव 6 धावांनी झाला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावा केलेल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 6 विकेटवर 246 धावा करु शकला. म्हणजेच मुंबईनं दोन्ही मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करेल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.

संबंधित बातम्या:

मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग

…तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts