ipl 2024 rishabh pant blistering fifty takes delhi capitals big score against chennai super kings

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rishabh Pant, IPL 2024 : भीषण अपघातानंतर ऋषभ पंत यानं शानदार कमबॅक केले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरोधात पंतने धुंवाधार फलंदाजी केली. ऋष पंत यानं अवघ्या 32 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पंतने तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरुवात करुन दिल्यानंतर पंतने दिल्लीची धावसंख्या 190 पार पोहचवली.  ऋषभ पंत आणि डेविड वॉर्नर यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेटच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. 

ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये  भीषण कार अपघात झाला होता. ऋषभ पंतचा जीव थोडक्यात वाचला होता.  अपघातानंतर ऋषभ पंत प्रथमच क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. आज चेन्नईविरोधात ऋषभ पंतनं या शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 160 चा राहिला. ऋषभ पंतनं वादळी अर्धशतक पूर्ण करताच विशाखापट्टणमच्या स्टेडिममध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं उभं राहून कौतुक केलं. त्याशिवाय सोशल मीडियावरही पंतवर कौतुकाचा वर्षाव होतोय. नेटकऱ्यांकडून पंतच्या खेळीचं कौतुक होतेय. 

ऋषभ पंतला आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण चेन्नईविरोधात ऋषभ पंत यानं 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पंतने आपल्या डावाची सुरुवात अतिशय संथ केली होती. पंतने पहिल्या 23 चेंडूमध्ये फक्त 23 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पंतने आक्रमक रुप धारण करत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. पंतने पुढील 9 चेंडूमध्ये 28 धावांचा पाऊस पाडला. पंतने एका षटकांमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. पंतच्या आक्रमक अर्धशतकानंतर दिल्लीच्या डगआऊटमधील प्रत्येकजण उभा राहून कौतुक करत होता. त्याशिवाय स्टेडियममधील प्रत्येक व्यक्तीने त्याचं कौतुक केले. 

दिल्लीची 191 धावांपर्यंत मजल – 

डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये 191 धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानंतर ऋषभ पंत याने वादळी अर्धशतक ठोकत धावसंख्या 191 पर्यंत पोहचवली. दिल्लीकडून थ्वी शॉ 43, वॉर्नर 52 आणि ऋषभ पंत याने 51 धावांची खेळी केली. चेन्नईकडून पथिराणा याने तीन विकेट घेतल्या.  

अधिक पाहा..[ad_2]

Related posts