shirur constituency maha vikas aghadi candidate amol kolhe mahayuti candidate shivajirao adhalrao patil clash

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) शिरुर लोकसभा (Shirur Constituency) मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका लग्न समारंभात राजकीय भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. महायुतीचे (Mahayuti) उमेदवार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) यांनी त्यांना लक्ष्य केलंय. सांस्कृतिक कार्यक्रमांत वाचाळवीरांसारखं बरळणं योग्य नाही, असं ते म्हणालेत. त्यांच्या याच टीकेला अमोल कोल्हे यांनी जशास तसं उतत्तर दिलं आहे.

गेट वेल सून, म्हणत अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर

अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नात घड्याळ आणि तुतारी या निवडणूक चिन्हाचा उल्लेख करत वधू आणि वरास आशीर्वाद दिले होते. त्यानंतर आढळराव यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता आढळरावांनादेखील कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आढळराव पाटील हे पराभवाच्या मानसिकतेतून बोलत आहेत. त्यामुळेच त्यांची चिडचीड होत आहे. ते वयस्कर आहेत. त्यांना एवढीच सदिच्छा देईल की “गेट वेल सून”. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.म्हणूच त्यांना बाहेरच्या नेत्यांना बोलवून बैठका घ्याव्या लागत आहेत, अस टोल अमोल कोल्हे यांनी लागवला. तसेच आढळराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर जी विधान केली आहेत त्यामुळे महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.  

अमोल कोल्हे काय म्हणाले होते? 

अमोल कोल्हे दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला गेले होते. विवाहस्थळी पोहोचण्यासाठी त्यांना उशीर झाला होता. उशीर का झाला, असे त्यांना तेथील एका व्यक्तीने विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना घड्याळ गेली आता वेळ काही जुळून येत नाही. पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी असं कोल्हे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर लग्नमंडपात हशा पिकला होता. 

अढळराव यांनी काय टीका केली होती?

कोल्हे यांच्या या विधानावर अढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. हे सुस्ककृतपणाचे लक्षण नाही. अमोल कोल्हे यांना कोणी शिकवण दिली, काय माहिती असे आढळराव पाटील म्हणाले होते. विवाहासरख्या आनंदाच्या क्षणाला कोल्हे वाचाळवीरासारखं बरळले. अशा आनंदाच्या क्षणी राजकीय विधानं करणं योग्य नाही. अमोल कोल्हे यांचं वागणं हे संस्कृतीत बसत नाही, अशी टीका आढळराव यांनी केली होती.

हे ही वाचा :

 सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस, पवारांच्या फोटोसोबत हार्ट इमोजी! म्हणतात ‘कितीबी समोर येऊदे….’

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts