Zero Hour Twitter Trend Click Hear For Political Use of trends for promotion Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour :  ट्विटरवर क्लिक हिअर ट्रेंड का होत आहे  ? राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी ट्रेंडचा वापर
गेल्या काही दिवसांपासून एक्स म्हणजेच ट्विटर सोशल मीडियावर “Click here” ट्रेंड होत आहे , ही नक्की काय भानगड आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.. शनिवारपासून मोठमोठ्या नेत्यांपासून, मोठमोठ्या राजकीय पक्षांपासून ते हजारो ट्विटर यूजर्संनी Click Here म्हणजेच ‘येथे क्लिक करा’ ट्रेंड खूप फॉलो केला आहे. यात एक फोटो शेअर केला जातो, ज्या मध्ये ठळक काळ्या फॉन्टमध्ये ‘Click Here’ म्हणजेच ‘येथे क्लिक करा’ असं लिहिलं आहे आणि त्या खाली तिरप्या दिशेने जाणारा एक बाण दाखवण्यात आला आहे. या बाणाच्या टोकाजवळ ALT (ए एल टी) ही अक्षरं आहेत. त्याला क्लिक केलं की यूजरने लिहिलेला मेसेज आपण पाहू शकतो. हे खरं तर अतिशय जुनं फिचर आहे, अल्ट ला क्लिक केल्यावर त्यातील मेसेज Text-To-Speech आणि ब्रेल लिपीच्या मदतीने फोटो नेमका कशाचा आहे ते समजून घेण्यास, दृष्टी अधू असलेल्या किंवा पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्तींना मदत होते. यामुळे अपलोड केलेल्या फोटोंमध्ये मजकूर किंवा सविस्तर माहिती जोडण्यास मदत करते. या ट्रेन्डमध्ये राजकारण्यांनी उडी घेतल्याने या चांगल्या, अतिशय कामाच्या फिचरला मनोरंजनाचं स्वरुप आलं.. लोकसभा निवडणुक प्रचारात सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला जात आहे. भाजपने पुन्हा एकदा मोदी सरकार लिहिलं तर शिवसेना उबाठाने भाजपवर टीका केली, आम आदमी पार्टीने चलो रामलीला मैदान लिहिलं, जयंत पाटील, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अशा पोस्ट केल्या आहेत. अंधांसाठीच्या फिचरचा असा गैरवापर करण्यावर सर्व स्तरातून टीका सुद्धा होत आहे. त्यामुळे आपणही थोडं जबाबदारीचं भान राखुया, दृष्टीहिनांना त्रास होईल किंवा आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होईल अशा ट्रेन्डमध्ये सहभागी होणं टाळुयात.
या बातमीसोबत झीरो अवरमध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची.. मात्र, तुम्ही कुठेही जावू नका..कारण, ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी दिलखुलास गप्पा…पाहात राहा, एबीपी माझा.

[ad_2]

Related posts