कामा रुग्णालयात नऊ नवीन विभाग सुरू होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कामा रुग्णालय जीटी मेडिकल कॉलेजला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयात लवकरच नऊ विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई आणि रायगड येथील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

जीटी रुग्णालयाचे 100 विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी जीटी रुग्णालयासह कामा रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयासोबतच कामा रुग्णालय आणखी अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कामा रुग्णालयात नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार कामा हॉस्पिटलमध्ये ऍनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, डायग्नोस्टिक्स, गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक्स असे नऊ नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांसाठी आवश्यक असलेले विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे.

जीटी मेडिकल कॉलेजला नॅशनल मेडिकल सायन्सेस कमिशनची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, अशी माहिती कामा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पालवे यांनी दिली. कामा रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असले तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर, रायगड या भागातून मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. याचा सर्वाधिक फायदा या रुग्णांना होणार आहे.


हेही वाचा

टीबीच्या औषधांचा तुटवडा, केंद्राचे महत्त्वाचे निर्देश


मोबाईल ॲपद्वारे बीएमसी हॉस्पिटलमध्ये लवकरच अपॉइंटमेंट बुक करता येणार

[ad_2]

Related posts