amravati lok sabha election 2024 mla ravi ran reply to mla bacchu kadu bjp vs prahar mahayuti navneet rana marathi news mahararashtra politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati Lok Sabha Election 2024 : जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पदासाठी, राजकारण करतो अशा लोकांवर मला फार काही बोलायचे नाही. ते देशाचे फार मोठे नेते झाले आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या ऐवजी यांनाच त्या ठिकाणी बसवले पाहिजे. जेणेकरून ते अमेरिकेत बसून आपल्या देशावर बरोबर लक्ष ठेवतील आणि त्यातून आपल्या देशाचा विकास होईल, असा खोचक टोला आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना लगावला आहे. खऱ्याअर्थाने अशा उच्च पदावर बसणारे ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना माझ्या भरपूर शुभेच्छाही आहेत. मात्र, त्यांना मी योग्य वेळी योग्य उत्तर देईल, असा इशाराही रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिला आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या जागी बच्चू कडूंना बसवलं पाहिजे

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील घटक पक्ष असलेले आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद कायम उफाळून येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंनी दंड थोपटले असून आगामी निवडणुकीत नवनीत राणांना पाडणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. अशातच काल बच्चू कडूंनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात राणा दाम्पत्यावर घणाघाती टीका करत, 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची इज्जत घालवली असल्याचे टीका केली होती.

कुठल्याही यंत्रणेकडून माझी चौकशी करा

बच्चू कडूंनी केलेल्या या टीकेला आता आमदार रवी राणांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी देखील माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मी स्वतः सांगतो की कुठल्याही यंत्रणेकडून माझी चौकशी करा, त्यातून जे बाहेर येईल त्याला सक्षमपणे उत्तर देण्यासाठी मी खंबीरपणे  उभा आहे. मात्र मला असं वाटते की रवी राणा हे एकमेव असे आहेत की ज्यांनी आपल्या पगारातून लोकांना घर बनवून दिले आहेत, लोकांच्या ट्युशन फीचे पैसे भरले आहेत. शिक्षणासाठी मी स्वत: अनेकांना पैसे दिले आहेत. त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जर गरज पडल्यास त्या व्यक्तींना आपला स्वतःचा पगार देणारा मी व्यक्ती आहे. माझी वाटेल ती चौकशी करा, अशा चौकशीला सामोरे जाण्यास माझी तयारी आहे. मात्र या आरोंपाना योग्य वेळी योग्य उत्तर नक्की देणार असल्याचेही रवी राणा म्हणाले.

मी कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तयार

सध्या घडीला मी जनतेच्या सेवेमध्ये व्यस्त आहे. कायम जनतेच्या न्यायासाठी मी लढत असतो. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी मी कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तयार असतो. त्यामुळे या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात कसे मजबूत करता येईल, देशाप्रती त्यांचे असलेले व्हिजन कशा पद्धतीने सत्यात उतरवता येईल, यासाठी आपण सर्व त्यांच्यासोबत असायला पाहिजे, असे देखील रवी राणा म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts