Sanjay Jadhav Criticized CM Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray Parbhani Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

परभणी : मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ अशी झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) घेऊन गेले मात्र टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना अशी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसलेला पैलवान भाजपवाल्यांना कधीही लुडबूड करू दिली नाही. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांची भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Parbhani Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना

परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय जाधव यांनी बंडखोरांवर टीका करताना म्हटलं की, आमचा पक्ष घेऊन गेले, मात्र शिवसेना टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्यासारखी आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कसलेले पैलवान होते. भाजपवाल्यांना त्यांनी कधीही लुडबूड करू आमच्यात करू दिली नाही, असं वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे. 

ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका – संजय जाधव

संजय जाधव पुढे म्हणाले की, आज परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेला धनुष्यबाण मिळून देणारा जिल्हा असताना मुख्यमंत्र्यांना इथे उमेदवार देता आला नाही, ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका आहे. वाशिम, रामटेक, हिंगोली अजून अनेक ठिकाणी यांची वाईट अवस्था झालीय. मात्रं आम्ही परभणीची जागा ही जिंकणारच तसेच राज्यभरामध्येही भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास परभणी लोकसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts