Chandrapur Lok Sabha Election congress candidate Pratibha Dhanorkar took a temporary loan worth of 39 crores Disclosure of information from prospectus maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Lok Sabha Election 2024) काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्याकडे तब्बल 39 कोटी रुपयांची रक्कम हातउसने स्वरूपात घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रातून ही बाब उघड झाली आहे. ज्यामध्ये तब्बल 77 जणांकडून ही उसनवारीची रक्कम घेण्यात आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी ज्या लोकांकडून ही कर्ज स्वरूपात रक्कम घेतली आहे त्यामध्ये खाजगी कंपन्या, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. मात्र त्यांनी हे कर्ज व्यवसायासाठी घेतलं आहे की इतर काही कारणांसाठी, याचा मात्र खुलासा अद्याप झालेला नाही.

उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या विवरणपत्रातून माहिती उघड 

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती 80 कोटीच्या वर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांत स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, गृहकर्ज, व्यवसायासाठीचे कर्ज, वाहन खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जासह फक्त तात्पुरते कर्ज म्हणून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. सोबतच धानोरकर यांनी खाजगी कंपन्या, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर नातेवाईकांकडूनही मोठ्याप्रमाणात तात्पुरते कर्ज स्वरूपात (हातउसने) पैसे घेतले आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी कर्ज घेतल्याचा तपशील

अनिल धानोरकर (दीर) – 10 लाख रुपये

नारायण धानोरकर (सासरे) – 31  लाख

नथ्थू धानोरकर (चुलत सासरे)- 10 लाख

प्रवीण काकडे (भाऊ) – 39 लाख

सुरेश धानोरकर (दिवंगत पती)- 75 लाख

पी.एच.एम. कंस्ट्रक्शन – 5 कोटी 50 लाख 20 हजार

बसंत सिंह (कंत्राटदार) -6 कोटी 46 लाख

प्रमोद मगरे (कंत्राटदार) – 1 कोटी 53  लाख

अंशीका ट्रेडर्स – 70 लाख रुपये

दामोदर सारडा (व्यावसायिक) – दीड कोटी रुपये

निकुंज हसानी (व्यावसायिक) –  2  कोटी 5 लाख रुपये

सुषमा सारडा – 50 लाख

गजानन किराणा स्टोर्स – 80 लाख रुपये

गौरीश एग्रो प्रायव्हेट लिमिटेड – 4 कोटी 23 लाख (मालमत्ता अग्रीम)

जय गिरनारी कंस्ट्रक्शन – 1 कोटी 57 लाख

ममता अल्लेवार – 40 लाख

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts