virat kohli vs babar azam who is better in t 20 world cup matches india vs pakistan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारतात सध्या क्रिकेट विश्वात आयपीएलची (IPL 2024) चर्चा सुरु आहे. आयपीएलमध्ये आज सोळाव्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. आयपीएलचा समारोप 26 मे रोजी होणार आहे. यानंतर पाच दिवसांनी टी-20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) सुरु होणार आहे. आयसीसीनं टी-20  वर्ल्डकपचं पोस्टर देखील जारी केलं आहे. यामध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) स्थान देण्यात आलं आहे.  विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळं दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. आता विराट कोहली आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात असेल की नाही याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहली आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam ) या दोघांची तुलना केली जाते. आपण विराट कोहली आणि बाबर आझमची टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरी कशी आहे हे जाणून घेऊयात.

विराट कोहलीचं कसं आहे रेकॉर्ड?

विराट कोहलीनं टीम इंडियाकडून 2012 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा सहभाग घेताल होता. त्यानंतर विराट कोहलीनं टी-20 वर्ल्ड कप पाचवेळा खेळला आहे. विराटनं आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 27 मॅच खेळल्या असून त्याच्या नावावर 1141 धावा आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहेत. विराटनं टी-20 वर्ल्ड कपमध्ये 81.5 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये खेळाडूंना 40 च्या सरासरीनं धावा करणं देखील अवघड असतं तिथं विराट कोहलीनं 80 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 27 मॅचपैकी 25 डावात त्यानं 14 अर्धशतकं केली आहेत. विराट कोहलीचं टी-20 वर्ल्ड कपमधील  प्रदर्शन चांगलं राहिलं आहे.  

बाबर आझम विराट कोहलीच्या तुलनेत कुठं?

पाकिस्तानच्या बाबर आझमनं 2021 मध्ये पाकिस्तानकडून पहिल्यांदा  टी-20 वर्ल्ड कप खेळला होता. बाबर आझमनं आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कप मध्ये 13 मॅच खेळल्या आहेत यामध्ये त्यानं 427 धावा केल्या आहेत. बाबर आझम सरासरीच्या बाबत विराटच्या खूप मागं आहे. विराट कोहलीची सरासरी 81  पेक्षा अधिक आहे त्याचवेळी बाबर आझमची सरासरी 35.58 इतकी आहे. कोहलीचं टी-20 वर्ल्ड कपमधील स्ट्राइक रेट 131.3 इतकं असून बाबर आझमचं स्ट्राइक रेट 114.47 इतकं आहे. बाबर आझमनं टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 अर्धशतकं केली आहेत. 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमधील मॅच होणार आहे.  

संबंधित बातम्या : 

Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस…फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!

ट्रोलिंग, अपमान, डिवचलं….; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts