dc vs kkr kolkata knight riders beat delhi capitals by 106 runs rishabh pant shreyas iyer

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज 16 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (IPL 2024 ) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) चा पराभव केला. केकेआरचा कर्णधार  श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवत 20 ओव्हर्समध्ये 7 बाद  272 धावांची खेळी केली. यामध्ये सुनील नरेन 85 धावा केल्या. रघुवंशीच्या 54 , आंद्रे रसेलनं 41 यांच्या धावांचा प्रमुख समावेश होता. दिल्लीनं 20 ओव्हर्सपैकी 18 व्या ओव्हरमध्य सर्वबाद 166 धावा केल्या.  

दिल्लीचा पराभव का झाला?

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमवर केकेआरनं मोठी धावसंख्या केलेली असल्यानं अगोदरचं दडपण आलेलं होतं. दिल्लीची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. दिल्लीनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या.  दिल्लीकडून रिषभ पंतनं 55 आणि स्टब्सनं 54 धावा केल्या. रिषभ पंतनं 25 बॉलमध्ये 4 चौकार आणि  5  षटकार मारले. तर  स्टब्सनं 4 फोर आणि चार सिक्स मारत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिषभ पंत आणि स्टब्स वगळता इतर खेळाडू चांगली फलंदाजी करु शकले नाहीत. दिल्लीनं 18 व्या ओव्हरमध्ये 10 विकेटवर 166 धावा केल्या.   

केकेआरची आक्रमक सुरुवात

कोलकाता नाईट रायडर्सनं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं त्यांनी आक्रमक फलंदाजी केली. केकेआरकडून सुनील नरेन, रघुवंशी यांच्यासह आंद्रे रसेलनं 41 धावा केल्या. रिंकू सिंगनं 26 तर फिलिप सॉल्टनं आणि श्रेयस अय्यरनं 18 धावा केल्या या धावांच्या जोरावर केकेआरनं 7 विकेटवर 272 धावा केल्या.

केकेआरचा आयपीएलमधील सलग तिसरा विजय 

कोलकाता नाईट रायडर्सनं ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर केकेआरनं दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबीचा पराभव केला होता. आज फलदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर केकेआरच्या बॉलर्सनी दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळू दिला नाही.

केकेआरची सर्वच पातळ्यांवर चांगली कामगिरी  

कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज सुरुवात केली आहे. आयपीएलमध्ये त्यांनी 3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये केकेआरनं  सर्वच पातळ्यांवर चागंली कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि श्रेत्ररक्षण या तिन्ही बाबींमध्ये केकेआरची  कामगिरी चांगली राहिली. केकेआरनं फलंदाजी करताना 7 बाद 272 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजांनी दिल्लीला  18 व्या ओव्हरमध्येच गुंडाळलं. दिल्लीचा संघ 166 धावा करु शकला. केकेआरचा संघ दिल्ली विरुद्धच्या  विजयामुळं गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या : 

KKR vs DC : सुनील नरेन ते आंद्रे रस्सेलचं वादळ,केकेआरचा दिल्लीपुढं धावांचा डोंगर,रिषभ सेनेला विजयसाठी किती धावा कराव्या लागणार?

DC vs KKR : श्रेयसनं टॉस जिंकला, कोलकाताचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय, विजयाची मालिका सुरु ठेवणार?

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts