Sanjay Raut Exclusive answer on which ministerial position is expected if india alliance win Lok Sabha Election 2024 ABP Majha Tondi Pariksha Show Maharashtra Political Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Exclusive : मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रासाठी (Maharashtra News) यंदाची निवडणूक काहीशी वेगळी असणार आहे. त्यासाठी कारण ठरलीय शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांमधील अंतर्गत बंडाळी. दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली असून दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांसाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमासाठी संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. अशातच यंदा लोकसभेत इंडिया आघाडी विजयी झाली आणि सरकार आलं, तर कोणत्या मंत्रिपदाची अपेक्षा आहे? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं संजय राऊतांनी हटके उत्तर दिलं आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी कधीच मंत्रिपदाचा विचार केला नाही. इतकी वर्ष मी दिल्लीत आहे, पण मंत्रिपदाचा विचार कधीच केला नाही. पण मला नक्कीच आट दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही जी खाती आहे, त्यांचा कंट्रोल माझ्यासाठी असावा, फक्त आठ दिवसासाठी, एवढंच मला वाटतं. मला दाखवायचंय ही खाती कशी चालतात.”

शिंदे आणि अजित पवार घाबरुन भाजपसोबत गेलेत : संजय राऊत 

शिवसेना, राष्ट्रवादी का फुटली? शिंदे आणि अजित पवार हे घाबरून भाजपसोबत गेले. त्यांच्या जाण्याची कारणं ही त्यांच्या डरपोकपणात आहेत. हे ईडी, सीबीआय, आयकर विभागाला घाबरून गेले आहेत, हे जग जाहिर आहे. भाजपनं त्यांना वॉशिग मशीनमधून स्वच्छ केलं म्हणून त्यांची पाप धुवून निघणार नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे लोक गेले ते का गेले, हे सर्वांना माहीत आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमासाठी एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये राऊत उपस्थित होते. मविआचं घोडं नक्की कुठे अडलंय? सांगलीच्या जागेवर काय तोडगा निघाला? यासोबतच अनेक प्रश्नांवर संजय राऊतांनी दिलखुलास उत्तरं दिली. 

पाहा व्हिडीओ : Tondi Pariksha Sanjay Raut : मला ED आणि CBI चं कंट्रोल आठ दिवसासाठी हवं : संजय राऊत : ABP Majha

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts