ipl 2024 mumbai indians get first win after four and eight defeats in previous seasons

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) सुरुवात खराब झालेली आहे. मुंबईला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सनं पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्स पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं संघाचं नेतृत्त्व बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईनं पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारले आहेत. मात्र, हे असं पहिल्यांदा घडलेलं नाही. यापूर्वी मुंबईच्या संघाला कधी आठ तर कधी चार सामन्यातील पराभवानंतर विजय मिळाला आहे. 

2022 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या आठ मॅचेसमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईला त्या हंगामात नवव्या मॅचमध्ये विजय मिळाला होता. 2014 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या पाच मॅचेसमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. सहाव्या मॅचमध्ये मुंबईनं विजय मिळवला होता. सुरुवातीला पाच मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतरही मुंबईनं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय केलं होतं.

2015 च्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये पराभूत होऊन पाचव्या मॅचमध्ये मुंबईला विजय मिळाला होता. मुंबईनं त्या हंगामामध्ये विजेतेपद पटकावलं होतं. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या चार मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर पाचव्या मॅचमध्ये विजय मिळाला होता.  रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सनं 2018 पहिल्या तीन मॅचेसमध्ये पराभव स्वीकारला होता. त्यानंतर त्यांना चौथ्या मॅचमध्ये विजय मिळाला होता.

मुंबईला यंदाही पहिल्या विजयाची प्रतीक्षा 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सचा पहिल्या विजयासाठी संघर्ष सुरु आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिल्यानंतर चाहत्यांकडून त्याला रोषाला सामोरं जावं लागलं होतं. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि  राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. आता मुंबई इंडियन्सची मॅच रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. या लढतीत तरी मुंबईला पहिला विजय मिळवता येतो का हे पाहावं लागेल. 

सूर्यकुमार यादव फिट, मुंबईला दिलासा 

टी-20 क्रिकेटमध्ये आयसीसीसच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी असणारा आणि मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं पहिले तीन सामने खेळू शकला नव्हता. आता सूर्यकुमार यादव फिट झाला असून तो मुंबईच्या संघातून खेळताना दिसेल. मात्र, सूर्यकुमार यादव दिल्ली विरुद्ध खेळू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई इंडियन्सचा संघ आता गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.  

संबंधित बातम्या :

ठरलं! सूर्यकुमार यादव उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार; दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार?

DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts