ipl 2024 indian premier league creats new viewership record this year in first 10 match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :आयपीएलचं 17 वं (IPL 2024) पर्व 22 मार्चपासून सुरु झालं आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये 16 मॅचेस झाल्या आहेत. आज 17 व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) आमने सामने येत आहेत. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचं उत्पन्न आणि दर्शकांची (IPL Viwership) संख्या दरवर्षी वाढत आहे. आयपीएलच्या पहिल्या 16 मॅचमध्ये अनेक विक्रमक तुटले आहेत. आता आयपीएलच्या दर्शकांच्या संख्येचा विक्रम देखील तुटला आहे.डिस्ने स्टारवर यंदा पहिल्या 10 मॅचमध्ये 35 कोटी यूजर्सनी आयपीएल मॅच पाहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत दर्शकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. 

आयपीएलच्या दर्शकांसंदर्भात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलद्वारे जारी केलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या पहिल्या 10 मॅचचा वॉच  टाईम 8028 कोटी मिनिटं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. 

डिस्ने स्टारकडून  आयपीएल 2024 चं प्रसारण 14 विविध भाषांमध्ये केलं जात आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी देखील डिस्ने स्टारकडून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

आयपीएलची सुरुवात 22 मार्चला झाली होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिली मॅच झाली होती. त्यावेळी 16.8 कोटी लोकांनी मॅच लाईव्ह पाहिली होती. सीएसके आणि आरसीबीतील मॅच आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिली गेलेली मॅच ठरली होती. 

डिस्ने स्टारचे हेंड संजोग गुप्ता यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की  आम्ही टाटा आयपीएल 2024 दर्शकसंख्येचा नवा रेकॉर्ड पाहून आनंदित आहोत. डिस्ने स्टारनं यापूर्वीचा सिझनं जिथं संपला तिथून नवी सुरुवात केल्याचं म्हटलं. 

आयपीएलचं स्टार स्पोर्टस आणि जिओ सिनेमावरुन प्रक्षेपण केलं जातं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दर्शक संख्या वाढलेली आहे. आयपीएलला वाढत जाणारा प्रतिसाद हा भारतीयांचं क्रिकेटप्रती असलेलं प्रेम दर्शवते. 

आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब भिडणार

आज आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत. गुजरातनं यंदाच्या आयपीएलमध्ये तीन पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, पंजाबच्या संघाला पहिल्या मॅचमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यांना पुढील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. आज गुजरात तिसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज दुसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. थोड्याच वेळात या मॅचचा टॉस होणार आहे. 

संबंधित बातम्या :

गुजरातच्या तीन खेळाडूंचं पंजाब कनेक्शन, शिखर धवनचं टेन्शन वाढवणार, पंजाब कसा मार्ग काढणार?

 

दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts