ipl 2024 mi vs rcb jasprit bumrah take five wickets including virat kohli faf du plesis rcb

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) आज टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याचा हा निर्णय जसप्रीत बुमराहनं योग्य ठरवला. जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीला 3 धावांवर बाद केलं. जसप्रीत बुमराहनं आरसीबीचा निम्मा संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहनं केलेल्या भेदक माऱ्यामुळं आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर 196 धावा केल्या. 

जसप्रीत बुमराहच्या जाळ्यात कोण कोण अडकलं?

मुंबई इंडियन्सला गेल्या हंगामात जसप्रीत बुमराह संघात नसल्यानं फटका बसला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह संघात असल्याचा मुंबईला फायदा आहे. जसप्रीत बुमराहनं आज सर्वप्रथम विराट कोहलीला बाद केलं. यानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस बुमराहला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये आल्यानं मुंबईचं टेन्शन मिटलं आहे. 

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसला बाद केल्यानंतर बुमराहनं महिपाल लोम्रोरला देखील बाद केलं. यानंतर बुमराहनं आरसीबीच्या आणखी दोन जणांना बाद केलं. सौरव चव्हाण आणि विजय व्यषकचा देखील बुमराहपुढं निभाव लागू शकला नाही.  

बुमराहनं आरसीबीचा निम्मा संघ बाद केला

जसप्रीत बुमराहनं यंदाच्या आयपीएलमधी चांगली कामगिरी केली. त्यानं चार ओव्हर्समध्ये 21 धावा देत 5 विकेट घेतल्या. यामध्ये विराट कोहली आणि फाफ  डु प्लेसिसच्या विकेट महत्त्वाच्या होत्या. 

पर्पल कॅप बुमराहकडे

जसप्रीत बुमराहनं आजच्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्यानं पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉपवर असलेल्या युजवेंद्र चहल याला देखील धक्का बसला आहे. युजवेंद्र चहल 10 विकेटसह टॉपवर होता. मात्र, जसप्रीत बुमराहनं 5 विकेट घेतल्यानं त्याच्या देखील एकूण विकेटची संख्या 10 झाली आहे. मात्र, 10 विकेट घेऊनही कमी धावा दिल्यानं पर्पल कॅपचा मानकरी जसप्रीत बुमराह ठरला आहे.

मुंबईची आक्रमक  सुरुवात

आरसीबीनं केलेल्या 196 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं आक्रमक सुरुवात केली. मुंबईची सलामीवर जोडी ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी केली. ईशान किशननं 69 धावा केल्या. नवव्या ओव्हरमध्येच मुंबईच्या 100 धावा पूर्ण झाल्या होत्या. मुंबईनं धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केल्यानं ते आरसीबीनं दिलेल्या धावांचा पाठलाग यशस्वीपणे करु शकतात ते पाहावं लागेल.

संबंधित बातम्या :

IPL 2024 MI vs RCB : डु प्लेसिस, पाटीदार ते कार्तिकची फटकेबाजी, बुमराहचे पाच धक्के, आरसीबीचं मुंबईपुढं किती धावांचं आव्हान?

Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढणार, बंगळुरु विरुद्ध भिडण्याअगोदर वर्ल्ड कप विजेता खेळाडू ताफ्यात, हार्दिक पांड्याचं टेन्शन मिटणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts