Village Of Widows In India Rajsthan S Budhpura Village Know Reason Behind Death Of Men

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Village of Widows : भारतात एक गाव आहे ज्याला ‘विधवांचे गाव’ म्हणतात. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील एक गाव, ज्याला विधवांचं गाव असं म्हटलं जातं. या गावातील बहुतांश महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत. या सर्व महिलांचे जीवन संघर्षांनी भरलेलं आहे. राजस्थान राज्यातील बुंदी जिल्ह्यातील या गावात सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू झाला आहे. या गावातील महिला मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

‘या’ गावातील सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू 

राजस्थानमध्ये असे एक गाव आहे, जिथे सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गावाला ‘विधवांचे गाव’ असंही म्हणतात. येथील परिस्थिती इतकी बिकट आहे की, विधवा महिलांनाच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. उदरनिर्वाहासाठी या गावातील बहुतांश महिला दिवसातील दहा ते दहा तास वाळूचे खडे फोडण्याचे आणि खोदकाम करतात.

‘हे’ आहे विधवांचं गाव

भारताच्या राजस्थान राज्यातील बुंदी जिल्ह्यातील बुधपुरा गाव विधवांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. या गावात राहणाऱ्या विधवा महिलांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. या गावातील बहुतेक महिलांनी त्यांचा जोडीदार गमावला आहे. या गावात पुरुषांच्या अकाली मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. या गावातील पुरुषांच्या अकाली मृत्यूचं नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडतो.

पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय?

या गावातील पुरुषांच्या अकाली मृत्यूमागील कारण सर्वज्ञात आहे. यामागचं मुख्य कारण आहे, या भागातील खाणी. तेथे धुळीचे कण हवेत इतके विरघळले आहेत की त्याचा परिणाम आता लोकांच्या फुफ्फुसावर दिसू लागला आहे. या गावात काम करणाऱ्या पुरुषांच्या मृत्यूला खाणी जबाबदार असल्याचे अनेक अहवाल सांगतात. येथील खाणींमध्ये काम करणाऱ्या पुरुषांना सिलिकोसिस नावाचा घातक आजार होतो. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होतो.

वाळूचे खडक फोडण्याचे काम

पतीच्या मृत्यूनंतरही येथील सर्व महिलांना मुलांचे संगोपन करण्यासाठी खाणीत काम करावं लागतं. बुधपुरा येथे वाळूचे खडे फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं. या कामात बाहेर पडणाऱ्या सिलिका धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग होतो. दुर्दैवाने, रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत, त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास होतो आणि त्यांना जीवघेणे आजार होतात. या गावात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी खाणीत काम केल्यामुळे पती गमावले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts