[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा मान भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या नावावर होता. चहरने बांगलादेशविरुद्ध २०१९ साली फक्त सात धावांत सहा विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर चहरचा सर्वोत्तम कामगिरीचा विश्वविक्रम हा मलेशियाच्या सियारझुल इद्रुसने मोडीत काढला आहे. इद्रुसने यावेळी टी- २० सामन्यात फक्त आठ धावांत सात विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच टी-२० क्रिकेटमध्ये सात विकेट्स मिळवल्या गेल्या आहेत. हा सामना टी-२० सामना असला तरी या लढतीत एकूण २० षटकांचाही खेळ झाला नाही.
हा सामना खेळवला गेला होता तो मलेशिया आणि चीन या देशांमध्ये. या सामन्यात चीनचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी इद्रुसने सात विकेट्स घेत चीनचे कंबरडे मोडले आणि त्यामुळे त्यांचा डाव फक्त २३ धावांत आटोपला. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणे मलेशियासाठी सोपे होते. पण मलेशियालाही यावेळी आक्रमक खेळ करता आला नाही. पहिल्याच चेंडूवर मलेशियाचा सलामीवीर स्ययद अझीझ बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात अजून ेक धक्का मलेशियाला बसला. दुसऱ्या षटकात मलेशियाचा दुसरा सलामीवीर मोहम्मद बाद झाला. त्यामुळे मलेशियाची २ बाद ३ अशी झाली होती. पण त्यानंतर मलेशियाचा विरेनदीर सिंगने १९ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तमब केले.
आयसीसीने टी-२० विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे आयोजन केले आहे. या पात्रता फेरीत हा सामना झाला. हा सामना मलेशियातच खेळवण्यात आला होता आणि त्यामध्ये चीडनची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले.
[ad_2]