[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नितीन मेनन यांचा भारतीय खेळाडूंवर आरोप
भारतीय पंच नितीन मेनन हे गेल्या काही वर्षांत आपल्या उत्कृष्ट अंपायरिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ते आयसीसी एलिट पॅनेलचा भाग आहेत. इतकंच नाही तर ते ऍशेसमध्येही कामगिरी बजावणार आहे. मात्र, मेनन यांनी असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू आपल्यावर निर्णयासाठी दबाव टाकतात, असा खुलासा त्यांनी केला आहे.
नितीन मेनन पीटीआयला म्हणाले, ‘टीम इंडिया जेव्हा भारतात खेळते तेव्हा खूप हाईप होते, भारतीय संघातील अनेक मोठे खेळाडू नेहमीच आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, ते ५०-५० निर्णय त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्या दबावाच्या परिस्थितीत आम्ही नियंत्रणात आहोत, तर ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे आम्ही लक्ष देत नाही. नितीन मेनन हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत आणि त्यांनी जून २०२० पासून १५ कसोटी, २४ एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे.
[ad_2]