Sports News Satwiksairaj Rankireddy And Chirag Shetty Win Indonesia Open Mens Doubles; सात्विक अन् चिरागने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनला पाणी पाजणारी पहिली भारतीय जोडी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दिल्ली : भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागने अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिकला आस्मान दाखवलं आहे. मलेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१८ अशा स्ट्रेट सेटमध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीचं हे पहिलं सुपर १००० वर्ल्ड टूर विजेतेपद आहे.

मलेशियाच्या जोडीविरुद्ध ७ वेळा पराभव झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांना पहिल्यांदा विजय मिळवता आला. इंडोनेशिया ओपनच्या डबल्स इव्हेंटमध्ये भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष डबल्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.
जागतिक खोके दिन ते सेनेचा वर्धापन दिन, आदित्य ठाकरेंचा जाहिरात नाट्यावरुन फडणवीसांना टोला, म्हणाले..
भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम जिंकला होता. मलेशियाच्या जोडीने सामन्यात सुरुवात आक्रमक केली होती. त्यांच्याकडे आघाडी होती पण पुन्हा मुसंडी मारत भारताच्या जोडीने पुनरागमन केलं. त्यानंतरही लढत अतितटीची झाली. १८ मिनिटात भारतीय जोडीने पहिला सेट जिंकला.

पवारांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण; निशाणा नेमका कोणावर? राजकीय वर्तुळात चर्चा

[ad_2]

Related posts