Suryakumar Yadav Hit Ball On Stumps; प्लॅनची चाहूल लागली, यश ठाकूरची हुशारी अन् सूर्या नको ते करुन बसला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंटस यांच्यामध्ये काल लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मॅच पार पडली. या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव मोक्याच्या क्षणी केवळ ७ धावा करुन बाद झाला. सूर्यकुमार यादवकडून मुंबईला मोठी अपेक्षा होती मात्र तो लखनऊ सुपर जाएंटस विरुद्ध चांगली कामगिरी करु शकला नाही. लखनऊच्या यश ठाकूरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं षटकार लगावण्याच्या प्रयत्नात मारलेला फटका थेट स्टंपवर जाऊन आदळला. यानंतर सूर्याच्या बाद होण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लखनऊनं मुंबईपुढं १७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मुंबईच्या डावाची १५ वी ओव्हर सुरु होती. लखनऊचा गोलंदाज यश ठाकूर बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार यादव स्ट्राइकवर होता. सूर्यकुमार लखनऊ विरुद्ध सुरुवातीपासून धिम्या गतीनं बॅटिंग करत होता. त्यामुळं त्यानं यश ठाकूरला षटकार मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तो बाद झाला.

सूर्यकुमार गुडघ्यावर बसून स्टंपच्या मागं षटकार मारायचा होता मात्र तो फटका मारल्यानंतर बॉल थेट स्टंपला वर जाऊन आदळला. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवनं या शॉटच्या सहाय्यानं भरपूर धावा केल्या होत्या. यश ठाकूरच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. ठाकूरनं यावेळी हुशारी दाखवली आणि बॉलचा वेग कमी ठेवत दिशा बदलली. त्यामुळं सूर्याचा प्रयत्न फसला.

Rahul Narvekar : आमदारांच्या निलंबनापूर्वी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करणार, राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले ?

सूर्यकुमार यादवनं जागा सोडून स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसल्यानं बॉल स्टंपवर जाऊन आदळला. सूर्यकुमार यादव केवळ ७ धावा करु शकला. ९ बॉलमध्ये तो केवळ ९ धावा करु शकला.

रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा लखनऊला फलंदाजीला आमंत्रित केलं होतं. लखनऊनं पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ३ विकेटवर १७७ धावा केल्या होत्या. १७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईचा पाच धावांनी पराभव झाला.
Devendra Fadnavis: कर्नाटकच्या प्रचारात दगदग झाल्याने फडणवीसांची प्रकृती बिघडली; सक्तीच्या विश्रांतीवर
रोहित शर्मा आणि इशान किशननं संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यांनी ९० धावांची सलामीची भागिदारी केली. रोहित शर्मानं ३७ धावा केल्या तर इशान किशननं ५९ धावा केल्या. सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, विष्णू विनोद हे सर्व खेळाडू मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. टीम डेव्हिडनं संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला मंत्रीपद देतो, १ कोटी ६७ लाख द्या; नड्डांच्या बोगस पीएचा भाजप आमदारांना फोन

[ad_2]

Related posts