IPL 2023 PBKS Playing Against DC Top Players When And Where To Watch Key Battles Records Stats

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PBKS vs DC Head to Head In IPL: आयपीएल 16 मधील 64 वा लीग सामना आज, 15 मे, बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. या दोन्ही संघांमधील हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे. दिल्ली आणि पंजाब सलग दुसऱ्या सामन्यात स्पर्धेत आमनेसामने असतील. याआधी झालेल्या सामन्यात पंजाबनं 31 धावांनी विजय मिळवला होता. तसेच, आयपीएलमध्ये दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत. पाहुयात दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी… 

पंजाब विरुद्ध दिल्ली Head to Head

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी पंजाबनं 16 आणि दिल्लीनं 15 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोघांमध्ये सर्वाधिक 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 6-6 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघ धरमशालातील चौथा सामना खेळणार

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांचा याआधीचा सामना झाला, ज्यात पंजाबनं 31 धावांनी विजय मिळवला. आजचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी 3 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने 2 विजयांसह आघाडी घेतली आहे, तर दिल्लीनं एक विजय मिळवला आहे. या मोसमातील या मैदानावरील आजचा पहिला सामना असेल.

अशा परिस्थितीत दिल्लीला या मैदानावर पंजाबसोबत स्कोअर सेट करायला आवडेल, तर पंजाब किंग्ज आपली आघाडी कायम राखून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी 

पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे. 

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन? 

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन :

सर्वात आधी फलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

सर्वात आधी गोलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, ऋषि धवन, अर्शदीप सिंह. 

इम्पॅक्ट प्लेयर्स : ऋषि धवन, अथर्व ताडये, नाथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजापक्षे.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

सर्वात आधी फलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मनीष पांडे, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

सर्वात आधी गोलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स :  मनीष पांडे, कुलदीप यादव, सरफराज अहमद, प्रियम गर्ग, ललित यादव

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs DC Playing Eleven: पंजाबसमोर दिल्लीचं आव्हान; अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

[ad_2]

Related posts