World Cup 2023: खड्ड्यात जा नाही येत तर…. भारताबद्दल बोलताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची जीभ घसरली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लाहोर: यंदा वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक भारतात भारतात खेळवला जाणार आहे. तर आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारताने पाकिस्तानात जाण्यापासून नकार दिल्याने आता आशिया चषक स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळवली जाणारा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी पीसीबीचे मत काय असावे, हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या म्हणण्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघाने भारतात जाऊ नये.आम्हाला काय फरक पडतो

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘मी आधी नकार देईन आणि जोपर्यंत भारत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही तिथे जाऊ नये, असे मला वाटते. भारताला पाकिस्तानात येऊन खेळावे लागेल. पूर्वी असे व्हायचे, एक वर्ष ते यायचे, एक वर्ष ते आमच्याशी जसे वागले आहेत… जोपर्यंत भारत येऊन पाकिस्तानात खेळत नाही, तोपर्यंत आम्हालाही तिथे जायची गरज नाही. त्यांच्यापेक्षा आमचे क्रिकेट चांगले आहे. आमचे क्रिकेट भारतापेक्षा खूप चांगल्या दर्जाचे आणि जबरदस्त आहे. आम्हाला त्यांची पर्वा नाही. नका येऊ, मी म्हणतो नाही येत तर खड्डयात जा. आम्हाला काय फरक पडतो?
२००८ पासून दौरा बंद

५० षटकांच्या आशिया चषकासाठी भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. उभय देशांमधील दीर्घकालीन भू-राजकीय तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेट संबंध बंद झाले आहेत. खेळ आणि राजकारण एकत्र करू नये, असे मियांदाद यांचे मत आहे. मी नेहमी म्हणतो की आपला शेजारी कोण असावा हे कोणीच निवडू शकत नाही, म्हणून एकमेकांच्या सहकार्याने राहणे चांगले आहे आणि मी नेहमी म्हणत आलो आहे की क्रिकेट हा एक खेळ आहे जो लोकांना एकमेकांच्या जवळ आणतो आणि गैरसमज दूर करतो आणि तक्रारी दूर करू शकतो.” जावेद मियांदाद यांच्या या वक्तव्याने भारत-पाकिस्तानमधील या विषयांना एक वेगळे वळण आले आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

[ad_2]

Related posts