आशिया कपमधून मिळालेला एक रुपया घेत नाही BCCI; करोडो रुपये कोणाला देते, वाचून अभिमान वाटेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: २०२३चा आशिया कप कुठे होणार हा वाद आता संपुष्ठात आला आहे. आशिया कप वनडेमधील काही सामने पाकिस्तानमध्ये तर काही श्रीलंकेत होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच श्रीलंकेत होतील. भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताने आतापर्यंत सर्वाधिक ७ वेळा आशिया कप जिंकला आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की, आशिया कपमधून मिळणारे पैसे कधीच बीसीसीआय स्वत:कडे ठेवत नाही.

माजी क्रिकेटपटू आणि आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा खेला आहे. तो म्हणतो की, अखेर आशिया कपचा वाद संपला. पण या निमित्ताने एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हापासून आशिया कपला सुरुवात झाली आहे तेव्हापासून या स्पर्धेच्या इतिहासात याचे उत्पन्न ब्रॉडकास्टमधून येते. पण बीसीसीआयने यातील एकही रुपया कधी घेतला नाही. बीसीसीआय एसीसीचा पैसा घेत देखील नाही.

आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, इतके मोठे उत्पन्न बीसीसीआय का घेत नाही आणि घेत नाही तर हा पैसा जातो तरी कोणाला? आशिया कपमध्ये जेव्हा बीसीसीआयच्या वाटेला काही रक्कम येते तेव्हा ती रक्कम एसीसीला दिली जाते. जेणेकरून ज्या देशात क्रिकेटच्या विकासासाठी निधीची गरज असेल तेथे वापर करता येईल. बीसीसीआय आशिया कपमधील कोणताही पैसा स्वत:साठी घेत नाही, असे म्हणत आकाश चोप्राांनी सांगितले की, बीसीसीआयला छोटी रक्कम नको असते. त्यांच्याकडे आधीच भरपूर पैसे आहेत. पण अन्य कोणताही देश असे करत नाही. श्रीलंका असो वा पाकिस्तान सर्व देश त्यांना मिळालेले पैसे घेतात.

भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. गेल्या काही वर्षात बीसीसीआयने भारतात क्रिकेटचा मोठा विस्तार केला आहे. एका रिपोर्टनुसार बीसीसीआयचे नेटवर्थ २ बिलियन डॉलर म्हणजे १६ हजार कोटी रुपये इतके आहे. बीसीसीआयला सर्वाधिक उत्पन्न आयपीएलच्या माध्यमातून मिळते.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts