Crime News Ahmedabad 13 Year Old Girl Plan To Kill Mother Who Took Away Her Phone; फोन घेतल्याच्या रागामुळे लेकीने घरातच रचला आईला ठार करण्याचा भयंकर कट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : देशात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे लेकीनेच आपल्या जन्मदात्या आईला संपवण्यासाठी असा सापळा रचला की वाचून तुम्ही हादराल. पण आईच्या सगळं काही लक्षात आल्याने त्यांनी पोलीस हेल्पलाईनवर मदत मागून मुलीचा कारनामा समोर आणला. पश्चिम अहमदाबाद इथं रहिवासी असणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला घरात काहीतरी भयंकर सुरू असल्याची शंका आली. यामुळे त्यांनी बारकाईने नजर ठेवली असता त्यांच्या हत्येचा कट त्यांची १३ वर्षांची मुलगी रचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.खरंतर, महिलेला अनेकदा त्यांच्या बाथरुमच्या फर्शीवर फिनाईल आणि पावडर टाकल्याचं दिसून आलं. इतकंच नाहीतर त्यांच्या साखरेच्या डब्यातली साखरऐवजी किटकनाशक पावडर आढळून आली. वारंवार असं होत असल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं असता या सगळ्यामागे त्यांची पोटची लेक असल्याचं समोर आलं. कारण, मुलीने काही दिवसांआधीच आईला ठार मारण्याची धमकी दिली होती. लेकच आपल्या हत्येचा कट रचत असल्याचं लक्षात येताच आईने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.

Mumbai Monsoon 2023: मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून Good News, पुढच्या ७२ तासांत मान्सून या भागांत बरसणार
‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, मुलीचा मोबाईल काढून घेतल्यामुळे ती नाराज होती. ती अद्याप अल्पवयीन आहे. पण सोशल मीडियावर ती खूप मित्रांशी बोलत होती. त्यामुळे तिचा मोबाईल घेऊन तिला ओरडल्यामुळे ती रागात होती आणि यातूनच तिने आईला ठार मारण्याचं प्लॅनिंग केल्याचं, महिलेने पोलिसांत सांगितलं. दरम्यान, महिलच्या तक्रारीवरून अभयम १८१ महिला हेल्पलाइनच्या समुपदेशकाने मुलीची चौकशी केली आणि यामध्येही धक्कादायक माहिती समोर आली.

आईला संपवून तिला पालकांना दुखवायचं होतं. कारण, त्यांनी माझा मोबाईल काढून घेतला, असं तिने पोलिसांना सांगितलं. यामुळे, कीटकनाशके घातलेली साखर खावी किंवा जमिनीवर घसरून आपटावे, अशी तिची इच्छा होती. मुलीच्या आईने काही दिवसांपूर्वी तिचा फोन हिसकावून तिला मारहाण केली होती. त्याच वेळी, तरुणीच्या पालकांनी सांगितले की, मुलगी जवळजवळ संपूर्ण रात्र फोनवर घालवायची. ती ऑनलाइन मित्रांशी गप्पा मारायची किंवा सोशल मीडियावर रील्स किंवा पोस्ट पाहण्यात वेळ घालवायची. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत होतं.

Mumbai Murder Case : सरस्वतीचा DNA, मनोजचा ‘तो’ मेसेज अन् सेक्स अ‍ॅडिक्ट; मिरारोड मर्डर केस पोलिसांनी सोडवली?
हे सत्य समोर आल्यानंतर मुलीच्या पालकांना धक्काच बसला. कारण, त्यांनी स्वप्नातही अशा घटनेचा विचार केला नव्हता. समुपदेशकांनी सांगितले की, त्यांना अधिक आश्चर्य वाटला कारण त्यांनी मुलीला सांभाळण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. जी त्यांच्या लग्नाच्या १३ वर्षांनंतर जन्माला आलेली एकच मुलगी आहे.

El Nino Effect : चक्रीवादळ, महामारी आणि भूकंपानंतर भारतावर आणखी एक मोठं संकट, सरकारची चिंता वाढली

[ad_2]

Related posts