सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलेल्या नासाच्या याननं दाखवलं सौरवादळाचं भयाण दृश्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : इस्रो (Isro) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं चांद्रयान 3 (Chnadrayaan 3) मोहिम हाती घेतली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरनं पाऊल ठेवताच या मोहिमेला यश आल्याचा क्षण संपूर्ण जगानं पाहिला. ही एक क्रांतीच होती. मुळात अंतराळाविषयी भारताच्या महत्त्वाकांक्षा यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. तिथं जागतिक स्तरावर NASA कडूनही आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या जगताविषयी सतत अशा काही गोष्टी आणि असे काही संदर्भ समोर आणले गेले की पाहणारेही हैराण झाले. आतासुद्धा नासाकडून असाच एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

विश्वास बसणार नाही…. 

सूर्याच्या कितपत जवळ पोहोचणं शक्य आहे? असा प्रश्न केल्यास आपल्याला त्याचं उत्तर देता येणार नाही. पण, नासानं मात्र ही किमया करून दाखवली आहे. कारण नासाचं एक यान थेट सूर्याच्या coronal mass ejection (CME) मधून पुढे गेलं आहे. सूर्याच्या नजीक पोहोचणारं हे पहिलं मानवनिर्मित यान ठरलं आहे. 

2018 मध्ये लाँच झालेल्या या यानानं आतापर्यंतचं सूर्याच्या सर्वात जवळचं स्थान गाठलं असून, नासाच्या अहवालानुसार Parker Solar Probe नं सूर्याच्या पृष्टापासून साधारण 9.2 मिलियन किलोमीटर दूर वर एका सौरवादळालाही तोंड दिलं. 22 सप्टेंबर 2022 ला हे यान सीएमहीतून पुढे गेलं. ज्यानंतर नासानं आता त्याचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये आजूबाजून अतिप्रचंड वेगानं जाणारे तारे, धुळ आणि उष्णतेच्या झळा पाहता येत आहेत. 

 

CME म्हणजे काय? 

‘कोरोनल मास इजेक्शन’ किंवा सीएमई सूर्यातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्मा आणि चुंबकिय लहरींच्या प्रचंड स्फोटामुळं तयार होतं. सौरज्वालांच्या संपर्कात आल्यामुळं सीएमई तयार होतं. नासानं शेअर केलेल्या या व्हिडीओसोबत काही माहितीही दिली जिथं त्यांनी, सौरउर्जा आजुबाजूच्या धुमकेतू आणि लघुग्रहांतून निघणाऱ्या धुलिकणांच्याही संपर्कात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

अंतराळ आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक रहस्य आपल्याला कायमच भारावून सोडते. आकाशात तळपणारा सूर्य अस्ताला जाताना किंवा भल्या पहाटे जेव्हा त्याचा दाह कमी असतो तेव्हाच त्याच्याकडे पाहण्याचं धाडस होतं. पण, याच सूर्याची अवकाातून दिसणारी झलक, त्याच्या आजुबाजूची परिस्थिती हे सर्वकाही जगातील विविध अंतराळ संशोधन संस्थांमुळं पाहणं शक्य होत आहे. 

Related posts