Whatsapp Launched New | WhatsApp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर नाही होणार अनोळखी कॉल्सचा त्रास, लाँच केले नवे फिचर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp New Feature:  हल्ली अनोळखी नंबर वरुन सतत कॉल्स येण्याचे प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच अनोळखी कॉल्स पासून व्हॉट्सअप (WhatsApp) आता तुमची सुटका करणार आहे. व्हॉट्सअपकडून लाँच करण्यात आलेल्या नव्या फिचरमुळे तुम्हाला आता अनोळखी नंबरवरचे कॉल सायलेंट करत येणार आहे. अनोळखी नंबर वरुन कॉल्स येऊन फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. याच गोष्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्हॉट्सअपकडून हे नवं फिचर लाँच केल्याचं सांगण्यात येत आहे. 

व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेबर्ग यांनी या नव्या फिचर विषयी माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या सर्व अँड्रोईड आणि अॅपल युजर्ससाठी हे फिचर लाँच केले आहे. या फिचरमुळे आता अनोळखी किंवा स्पॅम कॉल्स तुम्हाला सायलेंट करता येणार आहे. सुरुवातील हे फीचर व्हॉट्सअपच्या बीटा व्हर्जनमध्येच सुरु करण्यात आले होते. पण आता हे फिचर व्हॉट्सअपच्या सर्व व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आले आहे. 

कसं सुरु कराल हे फिचर?

हे फिचर सुरु करण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या व्हॉट्सअपचे व्हर्जन अपडेट करावे लागणार आहे. त्यानंत व्हॉट्सअपच्या सेटींग्जमध्ये जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपच्या प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाल कॉल्स हा ऑप्शन आलेला दिसेल. त्या ऑप्शनवक क्लिक केल्यानंतर तुम्हाला Silence Unknown Calls हा ऑप्शन येईल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येणारे अनोळखी कॉल्स हे सायलेंट करता येणार आहेत. या नवीन फिचर सोबतच व्हॉट्सअपकडून नवे privacy checkup हे नवे अपडेट देखील करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर फेक अकाऊंट किंवा प्रोफाईल बनवून फसवणूकीचे अनेक प्रकार घडतात. यामुळे तुमच्या महत्त्वपूर्ण माहितीचा चुकीचा वापर करण्याची देखील शक्यता असते. हल्ली व्हॉट्सअपवरुन आंतरराष्ट्रीय अनोळखी कॉल्स येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या सर्व गोष्टीपासून आता युजर्सना होणार त्रास बंद होणार असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच तुमच्या महत्त्वपूर्ण माहितीची गोपनीयता देखील यामुळे राखण्यास देखील मदत होणार आहे. त्यामुळे आता या फिचरचा युजर्सना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts