The History Of All 16 India Vs Pakistan Matches In Asia Cup From 1984 To 2018 Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup History, IND vs PAK  : क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं तर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan). दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉगबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आशिया चषकात टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे… यंदा श्रीलंकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने आतापर्यंत अटीतटीचे झाले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत आशिया कपमध्ये खेळलेले मोस्ट ऑफ सामने कमालीचे अटीतटीचे झाले आहेत, त्यामुळे यंदाही चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. 1984 पासून 2022 पर्यंत भारत आणि पाकिस्तान एकूण 16 वेळा आमने-सामने आले आहेत.  यामध्ये 16 सामन्यांत 9 वेळा भारत जिंकला असून 6 वेळा पाकिस्तान जिंकला आहे. 1997 सालचा एक सामना पावसामुळे अनिर्णीत देखील राहिला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या सामन्यात भारताचंच पारडं जड राहिल्याचं दिसून येतंय तर नेमके निकाल एकदा पाहूया.. 

1984 साली म्हणजेत भारताने 1983 विश्वचषक जिंकल्यावर एक वर्षाने भारत-पाकिस्तान आमने-सामने आले. हा सामना 54 धावांच्या तगड्या फरकाने भारताने जिंकला होता. 

1988 साली पुन्हा एकदा भारताने चार गडी राखून पाकिस्तानला मात दिली होती.

1995 साली मात्र प्रथमच पाकिस्तानने भारताला मात देत 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

1997 मध्ये पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.

2000 साली पुन्हा पाकिस्तानने 44 धावांच्या फरकाने विजय मिळवला.

2004 पुन्हा पाकिस्तान 59 धावांच्या फरकाने जिंकला अशारितीने 1997 चा अनिर्णीत सामना वगळला तर सलग तीन वेळा पाकिस्तानचा संघ जिंकला.

2008 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारताने सहा विकेट्सनी बाजी मारली. 

 2010, 2012 अशा दोन्ही वर्षी अनुक्रमे 3 आणि 6 विकेट्सच्या फरकाने भारतच जिंकला. 

2014 साली मात्र शाहीन आफ्रिदीच्या तुफान खेळीच्या जोरावर पाकिस्तान अवघ्या एका विकेटने सामना जिंकला.

2016 साली 5 विकेटने भारत जिंकला.

2018 मध्ये दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले यावेळी एकदा 8 तर एकदा 9 विकेट्सने भारताने विजय मिळवला. 

2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वेळा सामना झाला. दोन्ही संघाने एक एक विजय मिळवला.

आणखी वाचा :

Asia Cup 2023 : आशिया चषकात टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ, पाकिस्तानला फक्त दोन वेळा जेतेपद

Asia Cup 2023 : मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला!

IND vs PAK :  मौका… मौका… आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार ?

[ad_2]

Related posts