बर्मिंगहम : इंग्लंडच्या संघाला पहिल्याच कसोटीत चांगला घाम फोडला तो ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने. पहिल्या डावात ख्वाजाने शतक झळकावले होते. त्यानंतर आता इंग्लंडच्या विजयाच्या मार्गात तो मोठा अडसर बनला आहे. पण ख्वाजाने दोन्ही डावात दमदार फलंदाजी करताना एक भन्नाट विक्रम आपल्या नावावर केला आहे. तब्बल ४३ वर्षांनी क्रिकेटच्या इतिहासात ही गोष्ट प्रथमच घडली आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जर कोणता एक खेळाडू इंग्लंडला भिडला असेल तर तो आहे ख्वाजा. कारण ख्वाजाने इंग्लंडच्या नाकी नऊ आणले आहेत. पहिल्या डावात जेव्हा ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू बाद होत होते तेव्हा ख्वाजाने शतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने त्यांना २८१ धावांचे आव्हान दिले आणि त्यानंतर चार विकेट्स नंतर त्यांचा डाव अडचणीच आला होता. पण ख्वाजाने संघाचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना खेळपट्टीवर ठाण मांडला आणि त्याने संघाला विजयाचा मार्ग दाखवला. ख्वाजाने यावेळी अर्धशतकही झळकावले. पण ख्वाजाच्या नावावर आता एक भन्नाट विक्रम जमा झाला आहे. गेल्या ४३ वर्षांत कोणत्याही खेळाडूला ही गोष्ट जमली नव्हती.
या पहिल्या कसोटी सामन्यात ख्वाजा हा पाचही दिवस फलंदाजी करत असल्याचे समोर आले आहे. या सामन्यातील पाचही दिवस तो खेळपट्टीवर होता आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी दमदार फलंदाजी करत होता. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या पाचही दिवशी फलंदाज करणारा तो जगातील १३ वा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून किम ह्यूज यांनी हा पराक्रम १९८० साली केला होता, त्यानंतर आता तब्बल ४३ वर्षांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या संघाला जमली आहे. त्यामुळे एका मानाच्या यादीत ख्वाजाचे नाव लिहिले गेले आहे. ख्वाजाने अर्धशतक झळकावत संघाला विजयाचे स्वप्न दाखवले आहे. पण तो संघाला विजय मिळवून देतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस
ख्वाजाच्या नावावर आता दमदार विक्रम नोंदवला गेला आहे. क्रिकेट विश्वात फक्त १३ खेळाडूंनाच ही गोष्ट आतापर्यंत करता आली आहे.