[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
महिलेने या बाटलीचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये एक संदेश लिहिलेला आहे. या संदेशासोबत २९ मे १९८९ ही तारीखही होती. म्हणजेच ही बाटली एकूण ३४ वर्षांपूर्वी पाण्यात टाकण्यात आली असून ती इतके वर्ष समुद्रात तरंगत होती. शॅटलरच्या पोस्टमध्ये लिहिले- मला नेहमीच अशी कुठली अनोखी गोष्ट एके दिवशी मिळवायची होती. ज्यात अनेक वर्षे जुना संदेश असेल आणि तो मला मिळाला. बाटलीच्या फोटोसोबत शॅटलरने काही बर्फाळ टेकड्यांचा फोटोही पोस्ट केला होता.
जरी या बाटलीमध्ये कोणताही मोठा किंवा अद्वितीय संदेश नसला. तरी ती इतक्या वर्षांनी मिळणं ही मोठी गोष्ट होती. त्यात लिहिलेला संदेश होता- ‘हा एक सनी डे आहे, वारेही वाहत नाहीये.’ म्हणजे कोणीतरी फक्त गंमत म्हणून पाण्यात टाकले असेल. जेणेकरुन एखाद्यादिवशी हे कोणाला सापडेल.
बाटलीच्या मालकाचा पत्ताही मिळाला
ट्रूडी शॅटलरच्या फेसबुक पोस्टवर एक अपडेट देखील आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की तिला बाटलीचा मालक सापडला आहे. त्यांनी सांगितले की २९ मे १९८९ रोजी न्यूफाउंडलंडच्या पोर्ट ऑ चॉईक्स येथील गिल्बर्ट हॅमलिनने त्यांच्या बोटीतून (फॉक्स पॉइंट) बाटली समुद्रात फेकली. पोर्ट ऑ चॉईक्सपासून १० मैल दूर पाण्यात टाकण्यात आले.
बाटलीच्या मालकाशी संपर्क साधला
त्याने सांगितले की त्याला बाटलीच्या मागील बाजूस पत्ता सापडला, जो सेंट ऑगस्टीन नदी, क्विबेकपासून सुमारे १२ मैलांवर होता. पोस्टमध्ये शॅटलरने लिहिले – मी हॅमलिनचे छायाचित्र जोडले आहे. बाटलीच्या मालकाशी संपर्क साधला गेला आणि कळले की, दुर्दैवाने हॅमलिनचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. मी त्यांच्या मुलाशी बोलले आणि त्याने सांगितले की ही बाटली त्यांच्या वडिलांची आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी ३४ वर्षांपासून समुद्रात तरंगत असलेली बाटली घरी आणल्याबद्दल सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी लवकरात लवकर ही बाटली त्याच्या मुलाकडे पाठवेन.
[ad_2]