MS Dhoni Can Enter In Team India For Asia Cup 2023 ; धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात मिळणार स्थान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : गेल्या आशिया चषकात भारतीय संघाचे पानीपत झाले होते. सध्याच्या घडीला भारतीय संघाची अवस्था नाजूक आहे. या परिस्थितीत आशिया चषकात भारताची कामगिरी उंचवावी यासाठी बीसीसीआय एक मोठी चाल खेळण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.धोनीने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा जुना मॅचविनर धोनी पाहायला मिळाला होता. धोनीच्या नेतृत्वाबाबत तर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघाला पुढे घेऊन जाणारा कर्णधार हवा आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आणि त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करावे, अशी मागणी जोर धरत आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता धोनीला भारतीय संघात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा आशिया चषक म्हणजे बीसीसीआयच्या प्रतिष्ठेचा विषय असेल. कारण एकिकडे भारताने या आशिया चषकासाठी जागा बदलली आणि पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे आता आशिया चषकाच्या आयोजनात बीसीसीआयचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. पण स्पर्धेतही भारताचे वर्चस्व पाहायला मिळणार का, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या आशिया चषकात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हा आशिया चषक भारतासाठी महत्वाचा असेल.

हा आशिया चषक जिंकण्यासाठी बीसीसीआय आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. धोनी यावेळी भारतीय संघात मार्गदर्शकाचे काम करू शकतो. यापूर्वी जेव्हा भारतीय संघाल विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता तेव्हा धोनीला भारतीय संघात पाचारण करण्यात आले होते. धोनी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात दाखल झाला होता. सध्याच्या घडीला राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपत आला आहे. वनडे विश्वचचषकानंतर द्रविड भारतीय संघाबरोबर नसतील. त्यामुळे बीसीसीआय भविष्याचे पाऊल उचलून आता ही गोष्ट करत असल्याचे म्हटले जात आहे.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

सध्याच्या घडीला धोनी हा एक असा खेळाडू आहे जो भारतीय संघातील खेळाडूंबरोबर खेळला आहे. त्यामुळे धोनीला या खेळाडूंशी जुळवून घेताना जास्त समस्या जाणवणार नाही.

[ad_2]

Related posts