On This Day Cricket 2013 MS Dhoni Led Team India Beat England To Lift ICC Champions Trophy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MS Dhoni Led Team India to Champions Trophy : उत्कृष्ट कर्णधारांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचं नाव घेतलं जातं. एम. एस. धोनीनं दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भीम पराक्रम गाजवला होता. 10 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 23 जून 2013 रोजी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. भारताने इतिहासात पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली. या सोबतच धोनीनं ऐतिहासिक पराक्रम रचला होता. महेंद्र सिंह धोनी तीन आयसीसी व्हाईट-बॉल स्पर्धा जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला. 

धोनीच्या पराक्रमाला 10 वर्ष पूर्ण

भारताने 2013 मध्ये आजच्याच दिवशी इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पावसांमुळे रोमांचक ठरलेला हा सामना टीम इंडियाने पाच धावांनी जिंकला आणि धोनी तीन फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2011 आणि टी-20 वर्ल्ड कप 2007 ही जिंकला. अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही.

भारताने 10 वर्षांपूर्वी याच दिवशी जिंकली होती चॅपियन्स ट्रॉफी  

2013 मध्ये 6 जून 2013 रोजी आठ संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम सुरु झाला. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 23 जून रोजी खेळला गेला. भारत आणि यजमान इंग्लंडने आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली.

पावसामुळे सामन्यावर परिणाम, ओव्हर कमी

इंग्लंडमधील हवामानामुळे स्पर्धेवर परिणाम झाला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर अंतिम सामन्यावेळीही पाऊस पडला. त्यामुळे 50-50 षटकांचा सामना 20-20 षटकांचा करावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर सामना खेळवण्यात आला.

कोहली-जडेजानं सावरला डाव

इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या नवी सलामी जोडी पहिल्यांदाच मैदानावर उतरली. रोहित चौथ्याच षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. धवनने 31 धावा केल्यानंतर विराट कोहलीसोबत डाव सावरला.

धवन बाद होताच दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनी संघाच्या धावसंख्येत केवळ 2 धावांची भर घालून बाद झाले. यावेळी जडेजाने कोहलीसोबत 47 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. कोहली 43 धावा करून बाद झाला, तर जडेजाने 25 चेंडूत नाबाद 33 धावा करून टीम इंडियाची धावसंख्या 7 विकेट्सवर 129 पर्यंत नेली.

भारताचं 130 इंग्लंडसमोर धावाचं आव्हान

130 धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा कर्णधार दुसऱ्याच षटकात बाद झाला. इंग्लंडच्या फलंदाजांवर भारताचे गोलंदाज वरचढ ठरले. इंग्लंडने पटापट विकेट गमावल्या. नवव्या षटकापर्यंत इंग्लंडने 46 धावसंख्येवर चार विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडला 16 चेंडूत 20 धावांची गरज होती. अठराव्या षटकात इशांत शर्मा गोलंदाजीसाठी उतरला. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. या षटकात फक्त संघाला फक्त चार धावा करता आल्या. 

इंग्लंडला 12 चेंडूत 19 धावांची गरज

इंग्लंडला 12 चेंडूत 19 धावांची गरज होती. कर्णधार धोनीने गोलंदाजी जडेजावर सोपवली. जडेजाने अवघ्या तीन चेंडूत जोस बटलर आणि टीम ब्रेसनन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि 4 धावा देत इंग्लंडला बॅकफूटवर आणलं. 

अखेरच्या षटकातील थरार

यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. धोनीनं अश्विनच्या हाती चेंडू दिला. या षटकात दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक, त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी 2-2 धावा काढल्या. 

शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाचा विजय 

शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला सहा धावांची गरज होती. अश्विन समोर स्ट्राईकवर जेम्स ट्रेडवेल होता. अश्विनने स्टम्पच्या दिशेने चेंडू फेकला. ट्रेडवेलने बॅट भिरकावली पण, ती चेंडूला लागलीच नाही आणि भारताने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला.



[ad_2]

Related posts