Constipation High Fiber Rich Fruits Foods And Clean Stomach Instantly Naturally; पोट नैसर्गिकरित्या साफ करण्यासाठी व बद्धकोष्ठता आणि मूळव्याध संपवण्यासाठी खा ही ५ हाय फायबर फळं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Home remedies and Fruits For Constipation : उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढणे आणि सतत घाम येणे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. उन्हाळ्यात भूकही कमी लागते आणि त्यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येव्यतिरिक्त ब्लोटिंग अर्थात पोट फुगणे, अॅसिडिटी, छातीत जळजळ होणे आणि अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेमुळे सहजासहजी शौचास होणं कठीण होतं आणि शौच किंवा पॉटी दगडासारखी कडक होते.

अशा स्थितीत तुम्हाला गुद्द्द्वाराला सूज येणे, पोटात दुखणे, पोटात गोळे येणे, मळमळ होणे किंवा उलट्या होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. तुमच्याही मनात हा प्रश्न असेल की या बद्धकोष्ठतेवर उपाय काय आहेत? उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. अर्थात, या ऋतूत भूक कमी लागते पण तुम्ही तुमचे जेवण अजिबात चुकवू नये. अशी अनेक फळे आहेत ज्यात फायबरचे प्रमाण जास्तीत जास्त असते आणि त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts