vs-west-indies-test-series-these-5-players-are-contenders-for-number-3-position-including-yashasvi-jaiswal | IND Vs WI: पुजाराला डच्चू, तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला उतरणार ? या 5 नावांची चर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cheteshwar Pujara Replacement For West Indies Series : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला कसोटीमध्ये डच्चू मिळाला आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळाले नाही. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची नुकतीच निवड झाली. भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेय. चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी पाच नावे चर्चेत आहेत, पाहूयात त्या पाच खेळाडूंबाबत

चेतेश्वर पुजारा कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. आता त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियात कुणाला संधी मिळते याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. पाच नावे सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव यशस्वी जायस्वाल याचे आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या उपस्थितीत यशस्वी जायस्वाल याला डावाची सुरुवात करता येणार नाही. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. ईराणी चषकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शतके झळकावली आहेत. 

ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव- 
 
दमदार फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड यालाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. रेड बॉल क्रिकेटमध्ये गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी रतो. गायकवाडकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा शतकांची नोंद आहे. 

अनुभवी खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर उतरणार ?
यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याशिवाय शुभमन गिल यालाही तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी डावाची सुरुवात केल्यास तिसऱ्या क्रमांकवर शुभमन गिल याला खेळवले जाऊ शकते. शुभमन गिल याच्याकडे नव्या आणि जुन्या चेंडूवर खेळण्याचा तगडा अनुभव आहे. शुभमन गिल याच्याशिवाय अनुभवी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दोन पर्यायही टीम इंडियाकडे आहेत. विराट कोहलीकडे तिसऱ्या क्रमाकंवार फलंदाजी करण्याचा तगडा अनुभव आहे. 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

12 जुलैपासून विंडीजचा दौरा

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक – 

कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)

12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका

20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना 
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद

[ad_2]

Related posts