shikhar dhawan, PBKS vs DC: अप्रतिम, अफलातून, कल्पनेपलिकडचे,धवनची कमाल, हवेत उडी मारत पकडला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ – pbks vs dc shikhar dhawan took an amazing catch watch video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी सामना खेळला गेला. या सामन्यात आयपीएलच्या ६४ व्या सामन्यात शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला. हे दृश्य पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात धवनने शानदार फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची शिकार केली. या वेळी ११ वे षटक सुरू होते.गब्बरने चेंडू सोडलाच नाही

सॅम करनच्या दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नर फसला. त्याला चेंडूची लेंथ ठरवता आली नाही. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फटका चुकला. त्याने फटका मारल्यानंतर चेंडू उंच हवेत उडाला. त्यानंतर चेंडूच्या दिशेने शिखर धवन धावू लागला. गब्बरने धावताना आपली नजर चेंडूवर ठेवली आणि डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला.

MS Dhoni: धोनी तेव्हा खोटं बोलला होता; माजी कर्णधाराने पुराव्यासह शेअर केला व्हिडिओ
यादरम्यान धवनच्या हातातून चेंडू निसटतोय असे दिसले. पण त्याने तो सोडला नाही. पडताना धवनने अप्रतिम झेल घेत कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कांटेविरुद्धच्या सामन्यात ३७ वर्षीय धवनचा फिटनेस क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नरने ३१ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या.

MI Playoffs Scenario:मुंबई इंडियन्ससाठीचे प्लेऑफचे समीकरण; चक्क हार्दिक पंड्या मदतीला येऊ शकतो
रिले रुसोने केली स्फोटक फलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावांचा डोंगर उभा केला. वॉर्नरशिवाय फॉर्मात नसलेल्या पृथ्वी शॉनेही चांगली खेळी केली. त्याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार मारत ५४ धावा केल्या. त्याचवेळी, रिले रुसोने ६ चौकार आणि ६ षटकारांसह २२१ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह ३७ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. फिल सॉल्टने १४ चेंडूत २६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
IPL 2023 : धोनी खरंच सचिनच्या पाया पडला; जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटो मागचे सत्य

[ad_2]

Related posts