[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sameer Wankhede: आर्यन खान ड्रग्स प्रकरणी खंडणी मागितल्याचा आरोप असलेले IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयला (CBI) समीर वानखेडे यांची 22 मे पर्यंत चौकशी करता येणार नाही. त्याशिवाय, कायमस्वरुपी दिलासा मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) दाद मागावी असे निर्देशही दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) दिले आहेत.
समीर वानखेडे यांनी सीबीआय कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची कारवाई कोणत्या आधारावर सुरू आहे? माझ्या घरी सर्च ऑपरेशन का केले? असा प्रश्न करत माझ्यावर अन्याय होत असल्याचे वानखेडे यांनी याचिकेतून म्हटले होते. दिल्ली हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला महत्त्वाचे निर्देश दिले.
दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देताना उद्याची CBI चौकशी रोखली आहे. सीबीआयला 22 मेपर्यंत समीर वानखेडेंची चौकशी करता येणार नाही. तर, तूर्तास कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास सीबीआयने कोर्टात सहमती दर्शवली.
वानखेडेच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा
सीबीआयने (CBI) काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंच्या गोरेगावच्या घरी छापा टाकला होता. तेव्हाच समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोबाईलही जप्त करण्यात आला. समीर वानखेडेंची चौकशी झाल्यानंतर विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांनाही सीबीआय चौकशीसाठी समन्स बजावणार आहे.
काय आहे आर्यन खान प्रकरण?
एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.
एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.
आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.
या प्रकरणात पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप नंतर करण्यात आला. प्रसिद्धी आणि पैशासाठी हे सर्व घडवण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नंतर या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली.
[ad_2]