[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लखनौ : मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, याची वेगवेगळी समीकरण येत आहेत. पण मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, याबाबत आता मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले आहे.यापूर्वी रोहितला गुणतालिकेतबाबत विचारले, तर मी ती पाहत नाही, असे तो म्हणायचा. पण आता मात्र त्याने मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, यायाबत भाष्य केले आहे. मुंबईचा आता एकच सामना शिल्लक आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर काय होऊ शकते आणि त्यांनी गमावला तर काय होऊ शकते, याची सर्व गणितं आता समोर आली आहेत.
मुंबईच्या पराभवानंतर रोहितवर चौफेर टीका सुरु झाली आहे. कारण रोहितने या सामन्यात काही असे निर्णय घेतले जे चुकले आणि त्याचा फटका मुंबईच्या संघाला बसला. आतापर्यंत मुंबईचा संघ जिंकत होता, कारण रोहित कॅमेरून ग्रीनला वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठवायचा. ग्रीन हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजी यायचा आणि त्यामुळे मुंबईच्या धावगतीमध्ये फरक पडत होता. पण या सामन्यात रोहितने ग्रीनला उशिरा पाठवले आणि त्यामुळे मुंबईला हा सामना गमवावा लागला, असे चाहते म्हणत आहेत. पण या पराभवानंतर सारं काही मुंबईच्या बाजूने संपलेलं नाही.

लखनौचा सामना संपला आणि त्यानंतर रोहितला मुंबई इंडियन्सचा संघ कसा प्ले ऑफमध्ये पोहोचेल, असा प्रश्न विचारला. त्यावर रोहित म्हणाला की, ” प्ले ऑफची समीकरण कशी आहेत आणि ती कशी अंमलात उतरतील, याबाबत मला काहीच माहिती नाही. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, आमचा अखेरचा साखळी सामना शिल्लक आहे आणि तो सामना आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. आम्ही मैदानात उतरू आणि सामना जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू.”
मुंबई इंडियन्सचा आता एकच सामना बाकी आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर त्यांचे १६ गुण होऊ शकतात.
[ad_2]