[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पृथ्वी शॉने पंजाब किंग्जविरुद्ध ३८ चेंडूंत १४२.११ च्या स्ट्राइक रेटने ५४ धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि १ षटकारही पाहायला मिळाला. पंजाबविरुद्ध त्याने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. त्याचवेळी शॉला या सामन्यात स्टँडमधून एक विशेष पाठिंबा मिळत होता. या सामन्यात शॉला सपोर्ट करण्यासाठी निधी तापडियाने हजेरी लावली होती, शॉसोबत अनेकदा निधी तापडियाचे नाव अनेकदा चर्चेत असते. निधीने शॉच्या जबरदस्त फलंदाजीसाठी इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली आहे, जी स्वतः पृथ्वीनेही त्याच्या स्टोरीवर शेअर केली आहे. ते दोघेही अनेकदा एकमेकांविषयी पोस्ट करत तसेच उस्तवार कमेंट्स करताना दिसून येतात.
पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड म्हटले जाणारी निधी तापडिया ही महाराष्ट्रातील नाशिकची रहिवासी आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर १०७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निधीने कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. निधी लोकप्रिय क्राईम शो सीआयडीचा भाग देखील होती. शॉ आणि निधी दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसले आहेत. मात्र, पृथ्वी किंवा निधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी शॉने निधीसोबतचा एक फोटो शेअर करून तो डिलीट केला. इतकंच नाही तर आता निधी शॉला मैदानात सपोर्ट करायला सुद्धा पोहोचली आहे, या सगळ्या गोष्टींवरून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. एकेकाळी केएल राहुल आणि अथिया शेट्टी सुद्धा असेच होते. तथापि, शॉ आणि निधी रिलेशनशिपमध्ये असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
[ad_2]