Ipl 2023 Match 65th Rcb Vs Srh Probable Playing Xi Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bangalore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RCB vs SRH Probable Playing XI: आज, गुरुवार, 18 मे रोजी, आयपीएल 2023 च्या 65 व्या साखळी सामन्यासाठी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे संघ आमनेसामने असतील. या दोघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असेल, तर हैदराबादलाही हा सामना जिंकण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाणून घेऊया दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन… 

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर या दोघांमधील सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी यात समतोल राखणारी आहे, असं सांगितलं जात आहे. पण खेळपट्टी फिरकीपटुंसाठी अनुकूल असल्यानं फलंदाजांची कसोटी पणाला लागेल एवढं मात्र नक्की. शेवटचा सामना 112 धावांनी जिंकलेल्या आरसीबीला प्लेईंग इलेव्हनमध्ये फारसे बदल करेल असं वाटत नाही, तर हैदराबाद या सामन्यात बेंच स्ट्रेंथ आजमावू शकते. 

हैदराबादचा यापूर्वीचा सामना गुजरातसोबत झाला होता. गुजरातविरुद्धचा त्या सामन्यात हैदराबादला पराभव पत्करावा लागला होता. अशा स्थितीत संघात काही बदल जवळपास निश्चित आहेत. या सामन्यात अभिषेक शर्माला बेंचवर बसावं लागू शकतं, त्याच्या जागी मयंक अग्रवालचं संघात पुनरागमन होऊ शकतं. तसेच, उमरान मलिकही संघात पुनरागमन करू शकतो आणि हॅरी ब्रूकही पुनरागमन करू शकतो. आजची खेळपट्टी लक्षात घेऊन आदिल रशीदचाही संघात सहभाग केला जाऊ शकतो. 

सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन : 

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

पहिल्यांदा फलंदाजी : मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, हॅरी ब्रूक, सनवीर सिंह, मयंक मारकंडे, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

पहिल्यांदा गोलंदाजी : मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, आदिल रशीद, सनवीर सिंह, मयंक मारकंडे, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

इम्पॅक्ट प्लेयर्स : हॅरी ब्रूक, आदिल रशीद, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

पहिल्यांदा फलंदाजी : विराट कोहली (कर्णधार), फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माइकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

पहिल्यांदा गोलंदाजी : विराट कोहली (कर्णधार), फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विजयकुमार वैशक, माइकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट प्लेयर्स : विजयकुमार वैशक, दिनेश कार्तिक, शाहबाज़ अहमद, सिद्धार्थ कौल. 

[ad_2]

Related posts