नशीब असावं तर असं! जन्माच्या दोन दिवसांतच चिमुरडी बनली करोडपती, असं कसं घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Baby Girl Became Millionaire: एका मुलीचं जन्माच्या दोन दिवसांतच नशीब फळफळलं आहे. एका नवजात मुलीच्या नावावर अलीशान घर, लक्झरी कार आणि दिमतीला नोकर-चाकरांची सोय आत्तापासूनच करण्यात आली आहे. जन्माच्या 48 तासांतच ही चिमुरडी करोडो रुपयांची मालकीण ठरली आहे. तिच्या आजोबांनी तिला जवळपास 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ट्रस्ट फंड गिफ्ट केला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या बॅरी ड्रिविट-बार्लो यांच्या (Barrie Drewitt-Barlow) मुलीने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला. आजोबा झाल्याच्या आनंदात बैरी यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत नातीचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर नातीला गिफ्ट म्हणून कोट्यवधींचा बंगला आणि ट्रस्ट फंडदेखील दिले आहेत. 

इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

51 वर्षांच्या बैरी यांनी 10 कोटींचा अलिशान बंगला आणि जवळपास 52 कोटींचे ट्रस्ट फंड नातीच्या नावावर केले आहे. इन्स्टाग्रामवर लेकीचा आणि नातीचा फोटो शेअर करत त्यांनी छान कॅप्शनही दिलं आङे. आज माझ्या 23 वर्षांच्या मुलीने सॅफ्रन ड्रिविट-बार्लो हिने एका मुलीला जन्म दिला आहे. आम्ही आज खूप खुश आहोत. आम्ही आमच्या नातीला गिफ्ट दिलं आहे, असं लिहलं आहे. 

बंगला केला गिफ्ट

बैरी यांनी मागच्याच आठवड्यात एक बंगला खरेदी केला होता. आता नातीच्या आवडीनिवडीनुसार व तिच्या हिशोबाने बंगल्याचे डिझाइन करण्यात येणार आहे. कारण आता तो बंगला तिच्यासाठीच आहे, असं बैरी यांनी म्हटलं आहे. 

कोण आहे बैरी ड्रिविट-बार्लो?

बैरी हे उद्योजक आहेत. तसंच, इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वतःची ओळख आर्टिस्ट अशीही सांगितली आहे. एका अहवालानुसार, 1600 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बैरी  नेहमीच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोटींचे गिफ्ट देतात. यासाठी ते नेहमी चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांनी नाताळात 4 मिलियन पाऊंड खर्च केले होते. 

समलैंगिक आहेत बैरी

बैरी हे समलैंगिक आहेत. 1999 साली त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून ते दोन जुळ्या मुलांचे बाप झाले होते. त्यानंतर 2019 साली बैरी आणि त्याच्या जोडीदार टोनी यांचे ब्रेकअप झाले व ते वेगळे झाले होते. आता त्यांची मुलगी सॅफ्रनने एका मुलीला जन्म दिला आहे. नातीच्या जन्मानंतर बैरी यांनी आनंदात कोटींची संपत्ती तिच्या नावावर केली आहे. 

Related posts